Maharshtra Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने सध्या सर्वत्र मोठी रेलचेल पाहायला मिळत आहे. अनेकजण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत. काहीजण मूळ गावाहून पुन्हा एकदा आपल्या कर्मभूमीकडे प्रस्थान करत असल्याचे देखील दृश्य आता पाहायला मिळत आहे. कारण की उन्हाळी सुट्ट्या आता संपण्यात आहेत.
अशा परिस्थितीत सध्या स्थितीला रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. विविध रेल्वे मार्गांवर होत असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वेच्या माध्यमातून देखील प्रवाशांच्या सुविधेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून देशभरातील विविध रेल्वे मार्गांवर काही उन्हाळी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मुंबई आणि पुण्याहूनही अनेक विशेष गाड्या आत्तापर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच आता मुंबई आणि पुणे रेल्वे स्थानकावरून बालेश्वरसाठी उन्हाळी विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याचे वृत्त समोर आले आहे.
दरम्यान आता आपण मुंबई ते बालेश्वर आणि पुणे ते बालेश्वर या उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक कसे राहणार आहे आणि या दोन्ही गाड्या कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार मुंबई-बालेश्वर उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक?
मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१०५५ ही उन्हाळी विशेष गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरून १८ मे ला ११ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी बालेश्वरला पोहचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक ०१९५६ ही विशेष गाडी ९ वाजून ३० मिनिटांनी बालेश्वर येथून सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ५० मिनिटांनी मुंबई येथे पोहोचणार आहे.
मुंबई-बालेश्वर उन्हाळी विशेष गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या विशेष गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, क्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आहे.
पुणे-बालेश्वर उन्हाळी विशेष गाडीचे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१४५१ ही विशेष गाडी १८ मे ला सकाळी साडे अकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री साडे नऊ वाजता वाजता बालेश्वर येथे पोहचणार आहे.
या गाडीच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ०१४५२ ही विशेष ट्रेन २० मे ला सकाळी ९ वाजता बालेश्वर रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. मग ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी साडे सात वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.
पुणे-बालेश्वर उन्हाळी विशेष गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, सक्ती, रायगडा, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर आणि खरगपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.