महाराष्ट्रात तयार होणार 2 नवीन महामार्ग ! मुंबईहून ‘या’ शहराला जाणे होणार सोपे, पहा संपूर्ण रूट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात सध्या महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे. शहरा-शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग विकसित केला जात आहे. समृद्धी महामार्ग हा 700 km लांबीचा असून आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून काम पूर्ण झालेल्या मार्गावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील जलद गतीने पुर्ण होणार आहे.

ऑगस्ट 2024 मध्ये समृद्धी महामार्गाचा 76 किलोमीटर लांबीचा अर्थातच इगतपुरी ते आमने हा टप्पा पूर्ण होणार आहे. याशिवाय नागपूर ते गोवा दरम्यान देखील प्रवेश नियंत्रित महामार्ग विकसित केला जाणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमीन भूसंपादनाच्या कामासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील केली आहे.

मात्र, या महामार्गाच्या कामाचा शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या मार्गासाठी आम्ही आमच्या जमिनी देणार नाहीत असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे राज्यात मुंबई ते गोवा दरम्यान दोन नवीन महामार्ग तयार केले जाणार आहेत.

हे दोन्ही महामार्ग पत्रा देवी येथे गोव्याला जोडले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबत गोवा सरकारला नुकतेच कळवले आहे. हे दोन महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना देखील मोठा फायदा होणार आहे.

खरे तर मुंबई ते गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. या मार्गाचे काम कधी पुर्ण होणार असा सवाल नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जात आहे. अशातच आता गोव्याला जाण्यासाठी दोन नवीन मार्ग तयार होणार आहेत.

मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा सागरी किनारा मार्ग हे दोन महामार्ग विकसित केले जाणार आहेत. या दोन्ही महामार्गांसाठी अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही. परंतु याचा आराखडा तयार झाला आहे. दरम्यान आता आपण हे दोन महामार्ग नेमके कसे राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा राहणार मुंबई-गोवा द्रुतगती महामार्ग

हा मार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. हा मार्ग राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित केला जाणार आहे. हा महामार्ग ३८८ किमी लांबीचा आणि सहापदरी राहणार आहे. नवी मुंबईतील पनवेल येथून हा महामार्ग सुरू होणार आहे. तसेचं गोवा-महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी येथे संपणार आहे. या महामार्गामुळे आठ तासांचे अंतर केवळ तीन तासांवर येणार आहे.

या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित होत असलेल्या महामार्गासाठी ४२०५.२१ हेक्टर जागा संपादित करावी लागणार असा अंदाज आहे. या प्रकल्पासाठी जवळपास २५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. या मार्गामुळे प्रवाशांचे पाच तास वाचणार आहेत. परिणामी कोकणातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

कसा राहणार मुंबई ते गोवा सागरी मार्ग

राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई ते गोवा दरम्यान सागरी मार्ग विकसित केला जाणार आहे. हा मार्ग रेवस ते रेडी यादरम्यान विकसित केला जाईल. या महामार्गाची लांबी जवळपास 500 किलोमीटर एवढी राहणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार असून यासाठी अंदाजे दहा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

सागरी किनाऱ्यालगत मुळातच काही पूल आहेत. मात्र, ते एकमेकांना जोडलेले नाहीत. हेच कारण आहे की, सलग सागरी किनारा रस्ता तयार केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत पुलांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे देखील मुंबई ते गोवा हा प्रवास वेगवान होणार असून कोकणातील नागरिकांना याचा फायदा होईल अशी आशा आहे.

Leave a Comment