आनंदाची बातमी ! भविष्यात ‘या’ 7 मार्गांवर सुरु होणार बुलेट ट्रेन, महाराष्ट्रालाही मिळणार आणखी 2 बुलेट ट्रेनची भेट; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bullet Train 2024 : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी वंदे भारत एक्सप्रेस सारखी सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात 51 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेल्या आहेत. विशेष बाब अशी की, आगामी काही महिन्यात आणखी काही नवीन मार्गांवर ही गाडी सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे.

एवढेच नाही तर देशात आता बुलेट ट्रेन देखील धावणार आहे. सध्या मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून 2026 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित होणार अशी आशा आहे. म्हणजेच 2026 मध्ये बुलेट ट्रेन रुळावर धावताना दिसणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास हा गतिमान होणार आहे.

या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास खूपच जलद होणार अशी आशा आहे. एवढेच नाही तर रेल्वेच्या माध्यमातून आणखी सात नवीन मार्गांवर बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण हे सात प्रस्तावित मार्ग कोणते आहेत हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दिल्ली-अहमदाबाद बुलेट ट्रेन : राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते गुजरात येथील अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन चालवणे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही बुलेट ट्रेन उदयपूर मार्गे धावणार असून हा संपूर्ण मार्ग 878 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दिल्ली ते अहमदाबाद या दोन्ही शहराचे अंतर साडेतीन तासात पूर्ण होऊ शकणार आहे. दिल्ली ते अहमदाबाद हा प्रवास या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे वेगवान होणार आहे.

दिल्ली-अमृतसर बुलेट ट्रेन : चंदीगड मार्गे दिल्ली ते अमृतसर दरम्यान बुलेट ट्रेन मार्ग तयार केला जाणार आहे. हा मार्ग 459 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात हा मार्ग जम्मू पर्यंत वाढवला जाणार आहे. पठाणकोट मार्गे हा मार्ग जम्मू पर्यंत एक्सटेंड केला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

दिल्ली-वाराणसी बुलेट ट्रेन : भविष्यात काशीला देखील बुलेट ट्रेन ची भेट मिळणार आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली ते काशी दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. दिल्ली-आग्रा-कानपूर-लखनऊ-वाराणसी असा हा बुलेट ट्रेन चा मार्ग राहणार आहे. हा मार्ग 800 किलोमीटर लांबीचा राहणार असा दावा करण्यात आला आहे. ही बुलेट ट्रेन आयोध्या मार्गे धावणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्ली येथील जनतेला प्रभू श्री रामरायाचे सहजतेने दर्शन घेता येणार आहे.

वाराणसी-हावडा बुलेट ट्रेन : वाराणसी ते हावडा दरम्यान भविष्यात बुलेट ट्रेन धावणार आहे. या मार्गावर बुलेट ट्रेन चालवणे प्रस्तावित करण्यात आले आहे. पटना मार्गे ही बुलेट ट्रेन धावणार असून यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचे 760 km चे अंतर वेगाने पार करता येणे शक्य होणार आहे.

मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन : मुंबई ते नागपूर दरम्यान समृद्धी महामार्ग तयार केला जात आहे. सध्या या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून उर्वरित शहात्तर किलोमीटर लांबीचे काम लवकरच पूर्ण होईल आणि त्यावर वाहतूक सुरू होणार असा दावा केला जात आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. एवढेच नाही तर भविष्यात मुंबई आणि नागपूर यादरम्यान बुलेट ट्रेन देखील धावणार आहे. ही बुलेट ट्रेन नाशिकमार्गे धावणार असून हा मार्ग 760 km लांबीचा राहणार आहे. विशेष म्हणजे भविष्यात हाच मार्ग वाराणसी पर्यंत घेऊन जाण्याचा प्लान रेल्वेने आखला आहे. यामुळे महाराष्ट्रातील जनतेला देखील जलद गतीने काशीला पोहोचता येणार आहे.

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन : मुंबई ते हैदराबाद दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. हे 671 किलोमीटर लांबीचे अंतर बुलेट ट्रेन ने जलद गतीने पूर्ण करता येणार आहे. यामुळे राजधानी मुंबई येथील जनतेला हैदराबादला जलद गतीने पोहोचता येणार आहे. परिणामी राज्याच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे.

चेन्नई-मैसूर बुलेट ट्रेन : बेंगलोर मार्गे चेन्नई ते मैसूर दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. या दोन्ही शहरादरम्यानचे 435 किलोमीटर लांबीचे अंतर बुलेट ट्रेन ने कव्हर करता येणे शक्य होणार आहे. यामुळे चेन्नई ते मैसूर हा प्रवास जलद आणि वेगवान होणार आहे.

Leave a Comment