Maize Farming : सध्या महाराष्ट्रात खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामामध्ये गहू या प्रमुख अन्नधान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होण्याची शक्यता आहे. याशिवाय मक्याची देखील यंदा मोठ्या प्रमाणात पेरणी होणार आहे.
खरंतर मका हे खरीप हंगामात उत्पादित होणार एक मुख्य पीक आहे. याव्यतिरिक्त मक्याची रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. जर तुम्हीही येत्या रब्बी हंगामामध्ये मक्याची पेरणी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.
कारण की आज आपण रब्बी हंगामात लागवड योग्य मक्याच्या सुधारित जाती कोणत्या ? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग अधिकचा वेळ न दवडता थेट मुद्द्याला हात घालूया आणि रब्बी हंगामात पेरणीसाठी योग्य मक्याच्या सुधारित जातींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
मक्याच्या सुधारित जाती खालीलप्रमाणे
Pioneer P3524 : रब्बी हंगामात या वाणाची लागवड केली जाऊ शकते. मक्याचा हा वाण सरासरी 120 दिवसात परिपक्व होतो. या जातीपासून जवळपास 40 ते 50 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे लष्करी अळीचे प्रमाण कमी राहते. त्यामुळे मक्याची ही जात शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Advanta PAC 741 : या देखील जातीची रब्बी हंगामात लागवड केली जाऊ शकते. या जातीपासून 40 ते 50 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळते. पेरणी केल्यानंतर सरासरी 120 दिवसात परिपक्व बनते. या जातीसाठी थोडे जास्त पाणी लागते. परंतु चाऱ्याचे उत्पादनही चांगले मिळते.
Syngenta NK 6240 Plus : मक्याचा हा एक सुधारित प्रकार आहे. पेरणीनंतर सरासरी 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनत असल्याचा दावा केला जातो. विशेष म्हणजे या जातीपासूनही जवळपास 50 क्विंटल पर्यंतचे एकरी उत्पादन मिळते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कणीस वजनदार भरते. यामुळे चांगले उत्पादन मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या जातीच्या पिकाला थोडे पाणी कमी लागते.
Advanta ADV 757 : या जातीची देखील रब्बी हंगामात पेरणी केली जाऊ शकते. पेरणी केल्यानंतर सरासरी 110 ते 120 दिवसात या जातीचे पीक परिपक्व बनते. चाऱ्यासाठी हा खूपच भारी वाण आहे. जर तुम्ही धान्य आणि चारा अशा दोन्ही उद्देशाने मका लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा वाण फायदेशीर ठरू शकतो. या जातीपासून एकरी 40 ते 45 क्विंटल धान्याचे उत्पादन मिळते.
Pinnacle Dekalb : मक्याचा हा देखील एक चांगला प्रकार आहे. या जातीपासून 40 ते 45 क्विंटल प्रति एकर पर्यंतचे उत्पादन मिळते. पेरणीनंतर सरासरी 110 ते 120 दिवसात या जातीचे पीक तयार होते. मात्र या जातीवर लष्करी अळीचे प्रमाण थोडेसे अधिक पाहायला मिळते. यामुळे जर तुमच्या भागात लष्करी अळी अधिक असेल तर तुम्ही या जाती ऐवजी इतर जातींची लागवड केली पाहिजे.