Mansoon 2024 New Update : सध्या महाराष्ट्रात अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र भाजून निघाले आहे. उन्हाचे चटके आणि उकाडा असह्य होत असून अनेकांच्या माध्यमातून अखेर मान्सूनचे आगमन कधी होणार ? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनच्या चर्चा सुरू आहेत.
भारतीय हवामान विभाग देखील मान्सून संदर्भात वेळोवेळी अपडेट देत आहे. हवामान खात्याने केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधीपर्यंत होऊ शकते याविषयी अपडेट दिली आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मान्सूनचे 19 मे ला अंदमानात आगमन झाले आहे.
अंदमानात पोहोचल्यानंतर पुढे मान्सूनची वेगाने प्रगती सुरू आहे. आतापर्यंत मान्सूनच्या प्रवासात कोणताच अडथळा आलेला नाही. हेच कारण आहे की मान्सूनचा प्रवास खूपच जलद होत असून त्याच्या पुढील प्रवासासाठी पोषक परिस्थिती तयार झालेली आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी जर अशीच पोषक परिस्थिती कायम राहिली तर हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे मान्सूनचे 31 मे लाच आगमन होईल असे म्हटले आहे.
भारतीय हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, मान्सूनचे केरळमध्ये 31 मे च्या सुमारास आगमन होऊ शकते. यामध्ये तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात. अर्थातच 28 मे ते तीन जून या कालावधीत मानसूनचे केरळमध्ये आगमन होण्याची दाट शक्यता आहे.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्रात मान्सून आगमन कधी होणार ? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की यासंदर्भात अजूनही कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
परंतु सध्याची मान्सूनच्या प्रवासासाठी असणारी पोषक परिस्थिती पाहता 31 मे ला केरळमध्ये पोहोचल्यानंतर मानसून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी तळ कोकणात दाखल होऊ शकतो.
महाराष्ट्रातील तळ कोकणात आठ जूनच्या सुमारास मानसून आगमनाची शक्यता आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात मान्सून आठ जूनला पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर मग मान्सून नऊ ते दहा जूनच्या सुमारास सांस्कृतिक राजधानी पुण्यात सलामी देणार.
पुढे 11 जून च्या सुमारास मान्सूनचे राजधानी मुंबईत आगमन होणार अशी शक्यता आहे. मात्र याबाबत भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी अधिकृत अपडेट दिलेली नाही.
परंतु आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता मान्सून यंदा वेळेतच दाखल होण्याची शक्यता असल्याने नऊ-दहा जून च्या सुमारास पुण्यात आणि 11 जून च्या सुमारास मुंबईत मानसून आगमनाची दाट शक्यता आहे. 15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो.