Mansoon 2024 : उद्यापासून मे महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता साऱ्यांचे लक्ष मान्सूनकडे लागले आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू होता. आता मात्र वादळी पावसाचे सावट दूर झाले आहे. पावसाचे सावट दूर होताच तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढू लागला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा हा 43°c वर पोहोचला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असून याने राज्यातील जनता हैराण झाली आहे. मान्सून आगमन केव्हा होणार हा सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान मान्सून आगमनाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. ती म्हणजे यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
उकाड्याने हैराण जनतेची आता लवकरच तापदायक उन्हापासून सुटका होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 21 दिवसानंतर मानसून अंदमानात दाखल होणार आहे. म्हणजेच यावर्षी मान्सूनचे केरळात वेळेआधीच आगमन होईल असा अंदाज आहे.
हवामान तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे यंदा मोठ्या प्रमाणात उष्णता पाहायला मिळत आहे. या उष्णतेमुळे समुद्रातील पाण्याचे बाष्पीभवन खूपच जलद गतीने होत असून याचा मान्सूनला फायदा होत आहे. हवेचा दाब हा 850 हेक्टा पास्कल वर पोहोचला असून ही परीस्थिती मानसून आगमनासाठी पोषक ठरत आहे.
तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, हवेचा दाब हा समुद्रावर 1000 हेक्टा पास्कलवर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते. हवेचा दाब 1006 वर गेला की, मान्सून अंदमानात दाखल होतो. पुढे हा दाब 1008 वर गेला की, तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो.
सध्या हवेचा दाब हा 850 हेक्टा पास्कल वर पोहोचला असून लवकरच 1000 हेक्टा पास्कल वर जाणार आहे. याचा अर्थ मान्सूनची निर्मिती लवकरच सुरू होणार आहे.
हेच कारण आहे की मान्सून अंदमानात लवकरच येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून अंदमानात आल्यानंतर लगेचच मानसून केरळात दाखल होणार आहे.
निश्चितच केरळात जर मान्सूनचे वेळे आधीच आगमन झाले तर महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत अर्थातच तळ कोकणात देखील मानसून वेळेच्या आधीच दाखल होऊ शकतो. राज्यात सर्वप्रथम मान्सूनचे तळ कोकणात आगमन होते आणि यानंतर मानसून राज्याच्या उर्वरित भागांमध्ये प्रवेश घेतो.
दरवर्षी मान्सूनचे सात जूनच्या सुमारास तळ कोकणात आगमन होत असते. यावर्षी देखील याच सुमारास किंवा याआधी मान्सून तळकोकणात दाखल होऊ शकतो.