Mansoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर एप्रिल महिन्याचा पहिला पंधरवडा आज संपतोय. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांचे आता आगामी मान्सूनकडे लक्ष लागले आहे. गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यामुळे यंदा तरी चांगला पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान नैऋत्य मान्सून 2024 संदर्भात भारतीय हवामान विभागाचा पहिला-वहिला हवामान अंदाज समोर आला आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने भारतात 2024 मध्ये सामान्य मान्सून राहील असा अंदाज वर्तवला होता.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस बरसणार असे या संस्थेने म्हटले होते. दरम्यान आता भारतीय हवामान विभागाने देखील असाच अंदाज दिला आहे.
हवामान खात्याने यावर्षी भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. या वर्षी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज आहे. देशभरात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडेल, असे IMD ने म्हटले आहे.
हवामान खात्याने, दक्षिण-पश्चिम मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज देताना, मान्सूनच्या हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या 4 महिन्यात सामान्यपेक्षा जास्त (106% पेक्षा जास्त) पावसाची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे.
सध्या अल निनो विषुववृत्ताजवळ पॅसिफिक प्रदेशात आहे, जो हळूहळू कमकुवत होत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एल निनो कमकुवत होईल अन मान्सून काळात ला निनाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
परिणामी यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद होऊ शकते. 1 जून ते 30 सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात 87 सेंटीमीटर पाऊस पडेल असा अंदाज आहे. पण देशाच्या उत्तर पश्चिमी राज्यांमध्ये यंदा थोडा कमी पाऊस होऊ शकतो अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
उत्तर-पश्चिमी राज्यांमध्ये अर्थातच राजस्थान, गुजरात, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगालचा गंगेचा प्रदेश आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाची नोंद होऊ शकते.
IMD ने म्हटले आहे की येथे सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता (104 ते 110%) 29 टक्के एवढीच आहे. यामुळे येथे सामान्य पेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर यंदाच्या मान्सून मध्ये आपल्या महाराष्ट्रात चांगला समाधानकारक पाऊस होणार आहे.
त्यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मात्र यावर्षी राज्यात चांगला पाऊस बरसणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे