Mansoon 2024 : भारतीय हवामान खात्याने काल अर्थातच 15 एप्रिल 2024 ला मान्सून बाबतचा आपला पहिला-वहिला अंदाज देशापुढे मांडला आहे. हवामान खात्याने या आपल्या अंदाजात यावर्षी आठ जून 2024 ला मान्सूनचे आगमन होणार असे म्हटले आहे. यंदा सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अधिक अर्थातच 106% पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील मान्सून काळात पाऊसमान चांगले राहणार असा अंदाज आयएमडीने यावेळी व्यक्त केला आहे. एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव ज्या भारतीय हवामान विभागाच्या Mansoon अंदाजाची आतुरतेने वाट पाहत होते तो अंदाज आता समोर आला आहे.
यामध्ये यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे सध्या शेतकरी बांधव कमालीचे समाधानी पाहायला मिळत आहेत. खरेतर मान्सूनचा अंदाज समोर आला असल्याने आता सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहे.
शेतकरी बांधव आता मोठ्या उमेदीने खरीप हंगामासाठी कामाला लागणार आहे. शेतीच्या पूर्व मशागतीची कामे आता युद्ध पातळीवर सुरू होणार आहेत. दरम्यान, अशा या परिस्थितीत आज आपण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या काही वर्षांपासून राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाथरपुंज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र असे असले तरी आजही महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे गाव ओळखले जाते.
आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाची नोंद होते. याला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे भारतात सर्वात जास्त पाऊस मेघालय येथील चेरापुंजी या ठिकाणी पडतो.
यामुळे आंबोलीला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखतात. आंबोलीत वर्षाला साधारणपणानं साडे सात हजारांहून अधिक मिलीमीटर पावसाची नोंद होते. आंबोली हे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे.
हे एक प्रमुख पर्यटन स्थळ देखील आहे. थंड हवामानाचे हे ठिकाण पर्यटकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथून गोवा आणि कर्नाटक राज्य देखील जवळचं आहे. पाथरपुंज या गावात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.
हे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील गाव आहे, पण याचा विस्तार हा तीन जिल्ह्यांमध्ये आहे. या गावातील नागरिकांची घरे सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत आहेत. हे गाव सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे.
या गावात पाच वर्षांपूर्वी अर्थातच 2019 मध्ये राज्यातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती. मात्र यानंतर पुन्हा एकदा आंबोली हेच महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण ठरले आहे.