Mansoon News : गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मान्सूनच्या चर्चा रंगत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधापासून ते निवडणुकीच्या गडबडीतल्या राजकर्त्यांच्या एसी ऑफिस पर्यंत सर्वांच्या नजरा मान्सून कडे लागल्या आहेत. म्हणतात ना जल है तो कल है. पाणी हा शेती समवेतच सर्वचं क्षेत्रासाठी आवश्यक असणारा एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे मान्सून काळात समाधानकारक असा पाऊस झाला पाहिजे अशी साऱ्यांचीचं इच्छा असते.
दरम्यान याच मान्सून संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आज अंदमानात दाखल होणार आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या माध्यमातून अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहिली जात होती.
गेल्यावर्षी भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला असल्याने यंदा मान्सून कधी येतो आणि मान्सून काळात किती पाऊस पडणार? याच संदर्भात सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा होत होती.
दरम्यान हवामान खात्याने यंदा अंदमानात मान्सूनचे दोन दिवस आधीच अर्थातच आज 19 मेला आगमन होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दुसरीकडे केरळमध्ये मान्सून 31 मे ला दाखल होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
दरवर्षी केरळमध्ये एक जूनला मान्सून पोहोचत असतो यंदा मात्र एक दिवस आधीच मान्सूनचे केरळात आगमन होणार आहे. यावर्षी मान्सून काळात तब्बल 106% पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात यंदा पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळणार आहे. धो-धो पाऊस बरसणार आहे. त्यामुळे सध्या संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आय एम डी ने यंदा केरळमध्ये 31 मे च्या सुमारास मान्सून आगमनाची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजे येत्या बारा दिवसांनी केरळमध्ये मान्सून आगमन होणार असे हवामान खात्याने म्हटले आहे.
मात्र हवामान खात्याने जाहीर केलेल्या या तारखेमध्ये तीन-चार दिवस मागे पुढे होऊ शकतात. अर्थातच 28 मे ते 3 जून या कालावधीमध्ये यंदा केरळात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
तसेच मान्सूनसाठी अशीच अनुकूल परिस्थिती कायम राहिली तर केरळ नंतर आपल्या महाराष्ट्रात देखील अर्थात तळकोकणात देखील मान्सूनचे वेळेतच आगमन होण्याची शक्यता आहे. यंदा महाराष्ट्रात 11 जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज आहे.