March Bank Holiday : फेब्रुवारी महिना संपण्यास आता मात्र तीन दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. येत्या तीन दिवसांनी मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीआधीच बँक ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे मार्च महिन्यात जवळपास निम्मा महिना अर्थातच पंधरा दिवस बँका बंद राहणार आहेत. याबाबत आरबीआयकडून माहिती प्राप्त झाली आहे. परिणामी जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेत जाऊन काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची असतील तर याचे आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे.
पुढील महिन्यात काही ठिकाणी फक्त 15 दिवसांच्या कालावधीसाठी बँकेचे कामकाज सुरू राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात पाच रविवार आणि दुसरा तसेच चौथा शनिवार अशा 7 सुट्ट्या आणि इतर 7 दिवस सणासुदीच्या सुट्ट्या राहणार आहेत.
त्यामुळे पुढल्या महिन्यात बँकेशी निगडित कामे करताना ग्राहकांना विशेष सतर्क राहावे लागणार आहे. अन्यथा बँक ग्राहकांना पुढल्या महिन्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
यामुळे जर तुमचेही पुढल्या महिन्यात बँकेत काही इमर्जन्सी काम असेल तर आधी पुढल्या महिन्याच्या सुट्ट्यांची ही यादी एकदा नक्कीच चेक आउट करा. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया मार्च 2024 मधील सुट्ट्यांची यादी.
1 मार्च हा महिन्याचा पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, या दिवशी मिझोराम या राज्यात चापचूर कुट या निमित्ताने सुट्टी राहणार आहे.
3 मार्चला रविवार असल्याने संपूर्ण भारतात या दिवशी बँकांना सुट्टी राहणार आहे.
8 मार्चला महाशिवरात्रीचा पावन सण आहे. यामुळे संपूर्ण भारतभर या दिवशी बँकेला सुट्टी राहणार आहे.
9 मार्च 2024 ला दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.
10 मार्चला रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.
17 मार्चला रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.
22 मार्च 2024 ला बिहार येथे बिहार दिनानिमित्त बँका बंद राहतील.
23 मार्च रोजी चौदा शनिवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.
24 मार्च 2024 ला रविवार असल्याने संपूर्ण भारतभर बँका बंद राहतील.
25 मार्च 2024 ला होळी सणाच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.
26 मार्च 2024 ला याओसांग या निमित्ताने मणिपूर आणि ओडिशा या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत.
27 मार्च 2024 ला बिहार येथे होळीनिमित्त बँका बंद राहतील.
29 मार्च 2024 ला गुड फ्रायडे निमित्ताने संपूर्ण भारतभर बँका बंद राहणार आहेत.
31 मार्च 2024 ला रविवार असल्याने संपूर्ण देशभर बँका बंद राहतील.