Maruti Suzuki New WagonR : मारुती सुझुकी ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी आहे. या कंपनीच्या अनेक कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी वॅगनआर ही देखील कंपनीची अशीच एक लोकप्रिय गाडी आहे. मध्यमवर्गीयांमध्ये ही गाडी विशेष लोकप्रिय ठरलेली आहे.

दरम्यान कंपनीने याच गाडीबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वॅगनआर कार फ्लेक्स फ्युलवर धावणार आहे. 2024 च्या भारत मोबिलिटी एक्सपो मध्ये या गाडीला अनवील करण्यात आले आहे. खरे तर ही गाडी गेल्यावर्षी देखील स्पॉट करण्यात आली होती. यावर्षी पुन्हा एकदा कंपनीने ही गाडी भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये प्रदर्शित केली आहे.

Advertisement

यामुळे कंपनी लवकरच ही गाडी लॉन्च करणार अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत आज आपण फ्लेक्स फ्युलवर चालणाऱ्या या नवीन वॅगनआर गाडीच्या विशेषता काय राहणार याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मारुती वॅगनआर इथेनॉल-पेट्रोल मिश्रित इंधनासाठी पुन्हा इंजिनिअर करण्यात आली आहे. त्यामुळे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. मानक वॅगनआरच्या तुलनेत शोकेस केलेल्या नवीन कारचे बाह्यभाग अपरिवर्तित असले तरी, ‘फ्लेक्स-इंधन’ डिकल्स चुकवणे कठीण आहे.

Advertisement

कसे राहणार इंजिन ?

मीडिया रिपोर्टनुसार, या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या गाडीत 1.2-लिटर सामान्यपणे एस्पिरेटेड चार-सिलेंडर इंजिन असेल, जे 88.5bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करणार आहे. हे मानक म्हणून पाच-स्पीड मॅन्युअलसह उपलब्ध राहणार आहे. हे इंजिन इथेनॉल-पेट्रोल मिक्स इंधनासाठी तयार करण्यात आले आहे.

Advertisement

फ्लेक्स-इंधन कार केव्हा येणार बाजारात

कंपनी ही नवीन WagonR पुढील वर्षी विक्रीसाठी लॉन्च करू शकते. याचे उत्पादन 2025 पर्यंत विक्रीसाठी बाजारात दाखल होणार असा दावा काही मिळेल रिपोर्ट मध्ये केला जात आहे. याची किंमत ही मानक प्रकारापेक्षा थोडीशी जास्त राहील, असे काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *