Maruti Suzuki : मारुती सुझुकी ही देशातील सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. या कंपनीची मारुती सुझुकी अल्टो ही एक लोकप्रिय कार आहे. ही कार भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये सर्वात आवडती कार म्हणून ओळखली जाते. तुम्हीही अनेकांकडे ही कार पाहिली असेल.
विशेष म्हणजे कंपनीची ही कार अजूनही खूपच लोकप्रिय आहे. दरम्यान, याच लोकप्रिय कारच्या किमती बाबत कंपनीकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने या लोकप्रिय कारवर मोठी बंपर सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकप्रिय कारवर तब्बल 65 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्टो K10 या गाडीवर कंपनीकडून 65,000 पर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. विशेष म्हणजे कंपनीकडून सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही मॉडेलवर डिस्काउंट ऑफर केला जात आहे. यामुळे आता या कारच्या कोणत्या मॉडेल वर किती डिस्काउंट मिळत आहे हेच आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती डिस्काउंट मिळतोय
या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 3.99 लाख रुपये एवढी आहे. अशातच आता कंपनीने डिस्काउंट ऑफर सुरू केली असल्याने ही गाडी आणखी कमी मध्ये खरेदी करता येणार आहे. अल्टो K10 च्या पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंटवर 65 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट चाळीस हजार रुपये, एक्सचेंज डिस्काउंट पंधरा हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट सात हजार यांचा समावेश आहे.
पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेलवर 57,000 चा डिस्काउंट मिळत असून यामध्ये कॅश 35 हजार रुपये, एक्सचेंज 15 हजार रुपये आणि कॉर्पोरेट डिस्काउंट सात हजार रुपये राहणार आहे. सीएनजी वेरिएंट वर देखील सेम डिस्काउंट ऑफर मिळत आहे. निश्चितच जर ग्राहकांना स्वस्तात कार खरेदी करायचे असेल तर त्यांच्यासाठी मारुती सुझुकी अल्टो K10 हा सर्वोत्कृष्ट ऑप्शन ठरणार आहे.