Tata SUV Price : टाटा ही भारतातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. दरम्यान या देशातील लोकप्रिय ऑटो कंपनीने आपल्या ग्राहकांना जोर का झटका दिला आहे. जर तुम्हीही टाटा कंपनीची नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय मायक्रो एसयुव्ही कारची किंमत वाढवण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता टाटा कंपनीची एसयूव्ही खरेदी करणे महाग होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने मायक्रो एसयुव्ही पंचची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Advertisement

खरे तर, कंपनीने आधीच 1 फेब्रुवारी 2024 पासून गाड्यांच्या किमती वाढवल्या जातील असे सांगितले होते. त्यानुसार आता कंपनीकडून आपल्या लोकप्रिय मॉडेलच्या किमती वाढवल्या जात आहेत. मायक्रो SUV Punch ची किंमत देखील वाढवण्यात आली आहे.

जर तुम्हाला नजीकच्या भविष्यात ही एसयूव्ही खरेदी करायची असेल तर निश्चितच ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण की, आज आपण Tata SUV Punch ची किंमत किती वाढली आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ?

Advertisement

किती वाढली किंमत ?

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार Tata SUV Punch ची किंमत 17,000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आधी ही कार पाच लाख 99 हजार रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होती आता मात्र ही गाडी 6 लाख 12 हजार 900 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजे Tata Punch खरेदी करण्यासाठी आता ग्राहकांना अधिकचा खिसा रिकामा करावा लागणार आहे.

Advertisement

आता या गाडीची सुरुवातीची किंमत सहा लाख 12 हजार 900 एवढी करण्यात आली असून टॉप मॉडेलची किंमत 8 लाख 74 हजार 900 रुपये एवढी झाली आहे. अर्थातच, आता ग्राहकांचे कार खरेदीचे स्वप्न मागणार आहे. विशेष म्हणजे याच मॉडेलच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत असे नाही तर इतरही मॉडेलच्या किमती वाढवल्या गेल्या आहेत.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *