म्हाडाची घरे खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज, नवीन वेळापत्रक पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूरमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने 5,863 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. सध्या या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू आहे.

खरंतर या शहरांमध्ये गेल्या काही दशकांत घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहतात. परवडणाऱ्या दरात म्हाडा सर्वसामान्यांसाठी घर उपलब्ध करून देते.

दरम्यान, म्हाडा पुणे मंडळाने 5863 घरांसाठी सोडत जाहीर केली असून या सोडतीसाठी बुधवार अर्थातच 27 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत नागरिकांना अर्ज सादर करता आला नाही. मुदतीत अर्ज करणाऱ्यांची संख्या देखील कमी आहे आणि मुदतीत अर्ज करणाऱ्यांची आणि प्रत्यक्षात अनामत रक्कम भरणाऱ्यांची संख्येमध्ये देखील मोठी तफावत आहे.

अशा परिस्थितीत पुणे मंडळातील या सोडतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली पाहिजे अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर पुणे मंडळाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

या सोडतीसाठी पुणे मंडळाने आता तीन आठवड्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अशोक पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे मंडळाच्या या घर सोडतीसाठी आता 20 ऑक्टोबर पर्यंत इच्छुक नागरिकांना अर्ज सादर करता येणार आहे. आतापर्यंत 32 हजार 996 लोकांनी या सोडतसाठी अर्ज सादर केला असून यापैकी 18,269 लोकांनी प्रत्यक्षात अनामत रक्कम भरली असल्याची माहिती समोर आली आहे.

कुठं किती घरे? 

पुणे मंडळाच्या या सोडतीमध्ये पुणे जिल्ह्यात पाच हजार ४२५ सदनिका, सोलापूर जिल्ह्यात ६९ तसेच सांगलीत ३२ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३३७ सदनिकाचा समावेश करण्यात आला आहे. अर्थातच पुणे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 5863 सदनिका या सोडतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

यात म्हाडाच्या विविध योजनेंतर्गत ४०३ सदनिका, म्हाडाच्या पीएमएवाय योजनेंतर्गत ४३१, आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत २५८४ तसेच म्हाडाच्या योजनेंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिकांचा समावेश करण्यात आला आहे.

कसं आहे वेळापत्रक

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : आधी 27 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक होती मात्र यामध्ये तीन आठवड्यांची मुदत वाढवण्यात आली असून आता 20 ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक राहणार आहे.

ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची अंतिम दिनांक : 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत इच्छुक व्यक्तींना ऑनलाईन अनामत रक्कम भरता येणार आहे.

स्वीकृत अर्जांची प्रारुप यादी केव्हा जाहीर होणार : २७ ऑक्टोबरला म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रारूप यादी जाहीर होणार आहे. 

अंतिम यादी प्रसिद्ध केव्हा होणार? : या सोडतीची अंतिम यादी ३ नोव्हेंबरला अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणारा.

प्रत्यक्षात संगणकीय सोडत केव्हा निघणार :  ९ नोव्हेंबर स. १० वाजता या घरांसाठी प्रत्यक्ष संगणकीय सोडत काढली जाणार आहे. 

Leave a Comment