Mhada News : म्हाडा कोकण मंडळाच्या ४०८२ घरांसाठीच्या योजनेची लॉटरी काल म्हणजे 14 ऑगस्ट ला काढण्यात आली. ही लॉटरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कार्यक्रमाला हजर होते.
या कार्यक्रमा वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांबाबत काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या आहेत. मुंबई मंडळाच्या चार हजार 82 घरांसाठीच्या किमती खूपच अधिक होत्या.
यामुळे या सोडतीला सुरुवातीच्या टप्प्यात फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. पण मुंबई मंडळांने या योजनेच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर लाखोंच्या संख्येने या सोडतीसाठी अर्ज सादर झालेत.
सादर झालेल्या अर्जांपैकी एक लाख 22 हजार अर्ज पात्र ठरलेत आणि या एक लाख 22,000 अर्जदार लोकांपैकी चार हजार 82 अर्जदार लॉटरी पद्धतीने निवडण्यात आलेत. आता या विजेत्या अर्जदारांना येत्या काही महिन्यात घराचा ताबा दिला जाणार आहे.
दरम्यान मुंबई मंडळाच्या या लॉटरी प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सोडतीत म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होतील अशी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे, आता म्हाडाला गृहप्रकल्पांसाठी मोफत जमीन मिळत आहे.
यामुळे साहजिकच म्हाडाच्या गृहप्रकल्पातील घरांच्या किंमती खासगी विकसकांच्या प्रकल्पाहून कमी असणे अपेक्षित आहे. यामुळे आता महाराष्ट्र राज्य सरकार म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तसेच, पुढील घरांच्या सोडतीत घरांच्या किंमती या इतर घरांपेक्षा कमी राहतील अशी मोठी घोषणा देखील त्यांनी या कार्यक्रमावेळी केली. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडा मुंबई मंडळाच्या 2023 च्या लॉटरीमध्ये एका घरासाठी 30 अर्ज आले आहेत पण आता हे प्रमाण एकास पाचपर्यंत आणण्यासाठी म्हाडाला सहकार्य केले जाईल असे यावेळी जाहीर केले आहे.
यामुळे अधिकाधिक लोकांना म्हाडाच्या घरांचा लाभ घेता येईल असे सांगितले जात आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यात कोकण मंडळांच्या घरांची सोडत निघणार असल्याचे सांगितले आहे. कोकण मंडळ ऑक्टोबर महिन्यात साडेचार हजार घरांसाठी नवीन योजना जाहीर करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.