मोठी बातमी ! म्हाडाच्या 5,311 घरांसाठी ‘या’ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते निघणार लॉटरी, पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे आता सर्वसामान्यांना घर घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पैशांची जमवाजमव करतानाच सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येत आहे. खरंतर, घर उभारण्याचे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल.

काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण झाले असेल मात्र काही लोक आजही घरासाठी धडपड करत असतील. घर उभारण्यासाठी आपण आपल्या संपूर्ण आयुष्यात कमावलेली रक्कम खर्ची करत असतो. मात्र अलीकडे घरांच्या वाढलेल्या किमती पाहता सर्वसामान्यांना म्हाडा आणि सिडकोच्या घरांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

म्हाडा आणि सिडकोची घरे सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या घरांमुळे सर्वसामान्यांचे गृह खरेदीचे स्वप्न पूर्ण होत आहे. दरम्यान म्हाडा कोकण मंडळाच्या लॉटरीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

गेल्या वर्षी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरांची उपलब्धता व्हावी यासाठी म्हाडा कोकण मंडळांने घरांची योजना जाहीर केली होती. कोकण मंडळाने 5,311 घरांसाठी योजना जाहीर केली. यासाठी सप्टेंबर 2023 पासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या घरांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दरम्यान, या घरांसाठी गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच संगणकीय लॉटरी काढली जाणार होती.

मात्र, तांत्रिक कारणांमुळे ही लॉटरी नोव्हेंबर 2023 मध्ये निघू शकली नाही. मग पुढे डिसेंबरअखेर याची लॉटरी काढली जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण, या सोडतीसाठी मुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नव्हता. यामुळे डिसेंबर अखेरीसही लॉटरी निघू शकली नाही.

पुढे 26 जानेवारीला या कोकण मंडळाच्या घरांसाठी लॉटरी निघेल असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र मुख्यमंत्री महोदय यांची वेळ मिळत नसल्याने या लॉटरीला मुहूर्त लाभत नव्हता. आता मात्र मुख्यमंत्री महोदय यांची वेळ मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोकण मंडळाची 5,311 घरांसाठीची लॉटरी 24 फेब्रुवारी 2024 ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या लॉटरीसाठी 24 फेब्रुवारी चा मुहूर्त मिळाला हे खरे आहे मात्र अजूनही या लॉटरीची वेळ आणि ठिकाण कळू शकलेली नाही.

यामुळे अर्जदारांमध्ये अजूनही या लॉटरीबाबत संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. काही मीडिया रिपोर्ट मध्ये ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही लॉटरी काढली जाणार असा दावा केला जात आहे.

मात्र ही लॉटरी ठाणे येथेच निघेल याबाबत कोणतीच ठोस माहिती मिळालेली नाही. यामुळे आता कोकण मंडळाच्या पाच हजार 311 घरांसाठीच्या लॉटरीची वेळ आणि ठिकाण काय राहणार याकडे अर्जदारांचे बारीक लक्ष लागलेले आहे.

Leave a Comment