Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या परवडणाऱ्या घरांची मागणी वाढली आहे. घरांच्या किमती सातत्याने वाढत असल्याने आता सर्वसामान्यांचा कल म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांकडे वाढला आहे.
सर्वसामान्य नागरिक म्हाडा आणि सिडकोकडून उपलब्ध होणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, म्हाडा कोकण मंडळांने गेल्यावर्षी पाच हजार 311 लॉटरी जाहीर केली होती.
सप्टेंबर 2023 मध्ये या घरांसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली होती. याअंतर्गत 31 हजार 433 नागरिकांनी अर्ज सादर केले होते.
विशेष म्हणजे यापैकी 24 हजाराहून अधिक नागरिकांनी अनामत रकमेसह आपला अर्ज सादर केला आहे. दरम्यान या घरांसाठी नोव्हेंबर 2023 मध्ये सोडत काढणे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे ही सोडत नियोजित वेळेत निघू शकली नाही.
यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत या घरांसाठी संगणकीय सोडत काढली जाणार असा दावा केला जात होता. मात्र मुख्यमंत्री महोदय यांची वेळ मिळाली नसल्याने डिसेंबर अखेरीसही या सोडतीला मुहूर्त मिळाला नाही.
यामुळे या कोकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांच्या माध्यमातून अखेर या घरांसाठी संगणकीय सोडत केव्हा जाहीर होणार हा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान या घरांसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांची प्रतीक्षा आता संपणार आहे.कारण की कोकण मंडळाच्या पाच हजार 311 घरांसाठी मुहूर्त लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारी 2024 ला कोकण मंडळाच्या या 5,311 घरांसाठी संगणकीय सोडत काढले जाणार आहे. यामुळे हजारो नागरिकांचे घर निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात खरे उतरणार आहे.
विशेष म्हणजे ज्या दिवशी या सोडतीची लॉटरी निघेल त्याच दिवशी सायंकाळी प्रतीक्षा यादी देखील म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.या सोडतीमध्ये अनामत रकमेसह अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सोडतीचा दिनांक एसएमएस करून कळवण्यात आला आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून कोकण मंडळाचा ज्या 5311 घरांसाठीच्या सोडतीची वाट पाहिली जात होती त्याची संगणकीय सोडत 24 फेब्रुवारीला ठाण्यात पार पडणार आहे. ही सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढली जाणार आहे. यामुळे हजारो अर्जदारांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.