पोलिसांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केल्यास काय केले पाहिजे ? कायदे तज्ञांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Police Driving Licence : तुम्हीही टू व्हीलर, थ्री व्हीलर, फोर व्हीलर किंवा मालवाहतूक गाडी चालवता का? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. खरे तर भारतात कोणतेही वाहन चालवण्यासाठी परवाना आवश्यक असतो.

हा परवाना नसल्यास वाहन चालवणे हा गुन्हा समजला जातो. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालवताना ड्रायव्हिंग लायसन्स सदर चालकाकडे असणे आवश्यक आहे.

जर सदर वाहनचालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते तर काही प्रकरणांमध्ये अशा वाहनचालकावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो.

मात्र असे असले तरी जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल मात्र पोलिसांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केल्यास तुम्ही काय केले पाहिजे? याविषयी आज आपण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोलिसांनी तुमचे ड्रायव्हिंग लायसन जप्त केल्यास काय करणार ?

मुंबई उच्च न्यायालयातील ऍडवोकेट कल्याणी माणगावे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर (bol_kaydyache) दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलीस त्यांच्या संपूर्ण गणवेशात असतील तेव्हाच ते तुमचे लायसन्स जप्त करू शकता.

विशेष म्हणजे तुम्ही मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेले असेल तेव्हाच तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जप्त होऊ शकते.

जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी जप्त केले असेल आणि ते पोलीस त्यांच्या गणवेशात नसतील तर तुम्ही त्यांच्याकडून त्यांचे आयकार्ड मागितले पाहिजे.

याशिवाय जर पोलिसांनी तुमचे लायसन्स जप्त केले तर त्यांना लायसन्स जप्त केल्याची पोचपावती देणे अनिवार्य असते.

या पोचपावतीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी तुमचे लायसन्स जप्त केले आहे त्यांचे नाव, त्यांची पोस्ट आणि कोणत्या नियमाच्या उल्लंघणामुळे तुमचे लायसन्स जप्त करण्यात आले आहे याची संपूर्ण तपशीलवार माहिती नमूद केलेली असते.

यामुळे जर भविष्यात तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांनी जप्त केले असेल तर त्यांच्याकडून पोचपावती घेण्यास विसरू नका.

Leave a Comment