म्हाडाची घरे घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! Mhada ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. वाढती महागाई, वाढते बिल्डिंग मटेरियलचे दर, वाढते इंधनाचे दर या सर्व पार्श्वभूमीवर घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत.

विशेष म्हणजे आगामी काळात महागाई प्रमाणेच घरांच्या किमती आणखी वाढतच राहणार आहेत. यामुळे अलीकडे सर्वसामान्य लोकांना घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोक आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात.

मुंबई, पुणे, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, मुंबई महानगर क्षेत्र यासारख्या विभागात घर घेणारे सर्वसामान्य लोक नेहमीच म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. दरम्यान मुंबई महानगरक्षेत्रात घर घेऊन येणाऱ्या लोकांसाठी म्हाडा कोकण मंडळाने नुकतीच एक लॉटरी जाहीर केली आहे.

कोकण मंडळाने ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. पाच हजार 311 घरांसाठी ही लॉटरी जारी करण्यात आली आहे. दरम्यान, या लॉटरीबाबत कोकण मंडळांने एक मोठा निर्णय घेतला आहे.

खरंतर, कोकण मंडळाच्या या सोडतीला नागरिकांनी खूपच कमी प्रतिसाद दाखवला आहे. वास्तविक मुंबई महानगर क्षेत्रात जेव्हा लॉटरी निघते तेव्हा काही दिवसातच लाखो लोक अर्ज करतात. मात्र सध्या जाहीर करण्यात आलेल्या या 5 हजार 311 घरांसाठीच्या लॉटरीसाठी 10 हजारापेक्षा कमी अर्ज सादर झाले आहेत.

यामुळे या लॉटरीसाठीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रियेस तब्बल एका महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे MMR क्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना मोठा दिलासा मिळणार आहे आणि अनेकांचे घराचे स्वप्न यामुळे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.

वास्तविक, या सोडतीसाठी 15 सप्टेंबर पासून अर्ज विक्री आणि सुकृतीची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि 18 ऑक्टोबर पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार होती. मात्र अर्जदारांनी कमी प्रतिसाद दाखवला असल्याने आता ही मुदत वाढवण्यात आली आहे.

या निर्णयानुसार आता या घरांसाठी 18 नोव्हेंबर पर्यंत आरटीजीएस आणि एन ई एफ टी द्वारे अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहे. तसेच आता या सोडतीची 7 नोव्हेंबर रोजी होणारी लॉटरी रद्द करण्यात आली असून आता या सोडतीची लॉटरी 17 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.

Leave a Comment