Mhada News : गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या वाढल्या आहेत. इंधन, बिल्डिंग मटेरियल, मजुरी इत्यादीचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर घरांचे दर देखील वाढले आहेत. घरांच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना घरांचे स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.
वाढत्या महागाईमुळे महिन्याकाठी येणारा पगार हा घर खर्च भागवण्यातच निघून जातो. अशा परिस्थितीत स्वप्नातील घरनिर्मितीसाठी पैसाच शिल्लक राहत नसल्याचे दृश्य आहे. यामुळे सर्वसामान्यांना महागातील घरे खरेदी करता येत नाहीत.
परिणामी सर्वसामान्य लोक म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबई, पुणे, नाशिक, नवी मुंबई, अमरावती, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये तर घरांच्या किमती खूपच कडाडल्या आहेत.
अशा परिस्थितीत या महानगरात घराच्या निर्मितीचे स्वप्न पाहणारे असंख्य लोक म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
मुंबईमधल्या म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची वाट पाहणाऱ्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडा मुंबई मंडळ नवीन वर्षात सहाशे घरांसाठी लॉटरी जाहीर करणार असे वृत्त समोर आले आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मुंबई मंडळाने काढलेल्या लॉटरीतून शिल्लक राहिलेल्या सहाशे घरांचा या नवीन लॉटरीमध्ये समावेश होणार आहे.
विशेष म्हणजे एप्रिलमध्ये निघणाऱ्या या नव्या लॉटरीत आणखी काही घरे ऍड करता येतील का याबाबत देखील मुंबई मंडळाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये निघालेल्या म्हाडा मुंबई मंडळाच्या चार हजार 82 घरांसाठीच्या लॉटरीत 1250 विजेत्यांनी घराचा ताबा मिळवला आहे.
मात्र या लॉटरीत विजयी ठरलेल्या 600 लोकांनी आपली घरे परत केली आहेत. यामुळे ही घरे आता नवीन लॉटरीत समाविष्ट केली जाणार आहेत.
एकंदरीत आता या चालू वर्षात म्हाडा मुंबई मंडळ 600 हुन अधिक घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. यामुळे मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.