मोदी आवास योजना : महाराष्ट्रात 10 लाख घरकुले होणार मंजूर, ‘या’ लोकांना मिळणार लाभ, राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Modi Awas Yojana : मार्च 2023 मध्ये नवोदित शिंदे फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्प 2020-24 मध्ये राज्यातील जवळपास सर्वच घटकांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. यात शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, महिला, विद्यार्थी इत्यादींसाठी घोषणांचा पाऊस पाडण्यात आला.

यामध्ये राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेची देखील घोषणा करण्यात आली आहे. खरंतर राज्यात विविध समाजासाठी घरकुल योजना राबवल्या जातात. यात रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यांसारख्या योजनेचा समावेश आहे.

दरम्यान आता राज्यातील ओबीसींसाठी मोदी आवास योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांसाठी दहा लाख घरकुले बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेची अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाली मात्र पावसाळी अधिवेशन सुरु झाले तरीही या घोषणेला मृत रूप देण्यात आले नव्हते.

याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळालेली नव्हती. यामुळे याला लवकरात लवकर मंत्रिमंडळाची मान्यता मिळावी अशी मागणी जोर धरत होती. तसेच या योजनेला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली नसल्याने शासनाविरोधात ओबीसी समाजाचा रोषही वाढत होता.

अशातच गेल्या आठवड्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी आवास योजनेला मंजुरी दिली आहे. शुक्रवारी अर्थातच 21 जुलै 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मोदी आवास योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

दरम्यान, आज आपण शासनाने जाहीर केलेल्या मोदी आवास योजनेसाठी कोण पात्र राहणार आहेत आणि या अंतर्गत घरकुलासाठी किती अनुदान मिळणार आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मोदी आवास योजनेचे स्वरूप

या मोदी आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाकडून येत्या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी उपलब्ध होणार असून यासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोदी आवास योजना अंतर्गत ओबीसी समाजासाठी घरकुल योजना ग्रामविकास विभाग राबवणार आहे. पण या योजनेसाठी आवश्यक असणारा निधी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून पुरवला जाणार आहे. 

मोदी आवास योजनेसाठी पात्रता आणि अटी

ही योजना राज्यातील ओबीसी समाजासाठी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्य असलेल्या ओबीसी समाजातील नागरिकांना लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत पक्के घर नसलेल्या लोकांना लाभ दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना आधी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना या योजनेअंतर्गत कव्हर केले जाणार आहे.

किती अनुदान मिळणार ?

या योजनेअंतर्गत ओबीसी समाजातील नागरिकांना पक्के घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कच्चे घर असलेल्या आणि स्वतःची जागा असलेल्या ओबीसी समाजातील नागरिकांना या योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment