Modi Government Scheme : भारत हा शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे. कारण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण जनसंख्येपैकी जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्येचे उपजीविकेचे प्रमुख साधन शेती व शेतीपूरक व्यवसाय आहेत.
यामुळे देशाला कृषिप्रधान देश म्हणून ओळखले जाते. यामुळे बळीराजा हा आपल्या देशाचा कणा बनला आहे. म्हणून देशातील शेती क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.
मात्र जगाचा पालन पोषण करणारा बळीराजा नैसर्गिक संकटांमुळे आणि काही सुलतानी संकटांमुळे गेल्या काही दशकांमध्ये पूर्णपणे बेजार झाल्याचे चित्र आहे. यावर्षी तर शेतकऱ्यांना निसर्गाची अजिबात साथ लाभलेली नाही.
मान्सून काळात खूपच कमी पाऊस बरसला असल्याने शेतकरी संकटात आले आहेत. उत्पादनात मोठी घट आली आहे. खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित कमाई होणार नाहीये शिवाय रब्बी हंगाम देखील कमी पावसामुळे प्रभावित होईल असे सांगितले जात आहे.
अशातच मात्र दुष्काळाच्या कुचक्रात सापडलेल्या बळीराजासाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील मोदी सरकारकडून देशभरातील जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जाणार आहेत.
पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 14 हफ्ते वितरित झाले आहेत. मागील 14 वा हप्ता हा 27 जुलै रोजी वितरित झाला होता.
यामुळे आता पंधरावा हफ्ता खात्यात केव्हा जमा होणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये पीएम किसानचा पंधरावा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असा दावा करण्यात आला आहे.
एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेत दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा या चालू महिन्याच्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खरंतर येत्या तीन दिवसात महाराष्ट्राचा संपूर्ण देशभरात दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.
यामुळे या योजनेचा पंधरावा हप्ता हा दिवाळीपूर्वी मिळाला पाहिजे होता असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या योजनेचा पंधरावा हप्ता हा दिवाळी पूर्वी जमा होणार नाही हे स्पष्ट होत आहे. पण नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळेल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.
तथापि या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर ई-केवायसीची प्रक्रिया, जमीन सत्यापनाची आणि बँक खाते आधार सोबत लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही तीन कामे केली तरच या योजनेचा पुढील हफ्ता मिळू शकणार आहे.