मोदी सरकार देशभरातील महिलांना देणार मोठी भेट ! नवरात्र उत्सवात घेणार ‘हा’ मोठा निर्णय, आता महिलांना…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Modi Sarkar : आगामी वर्षात म्हणजेच 2024 मध्ये देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. याशिवाय पुढल्या वर्षी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान सह एकूण पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुलही वाजणार आहे.

अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेषतः महिलांना खुश करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार विविध प्रयत्न करत असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने LPG गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या.

उज्वला योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एवढेच नाही तर महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय देखील केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. अशातच आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी आणखी एक मोठा निर्णय मोदी सरकार घेणार त्याचे सांगितले जात आहे.

खरंतर महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या या निर्णयावर देशभरात एकमत पाहायला मिळाले. विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून देण्यात आलेल्या या निर्णयाचे तोंड भरून कौतुक केले. सर्वत्र या निर्णयाची वाहवा करण्यात आली.

अशातच आता देशभरातील लाखो महिलांसाठी केंद्र सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे. मतदानात महिलांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी केंद्र शासनाकडून आता महिलांना मोठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

महिलांसाठी भाजपा सरकार काय निर्णय घेणार

केंद्र शासन देशभरातील महिलांसाठी या चालू महिन्यात होणाऱ्या नवरात्र उत्सवात एक मोठी भेट देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र शासन देशभरातील महिलांना आता स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे. देशातील महिलांना सशक्त करण्यासाठी केंद्र सरकार हा निर्णय घेणार आहे.

निश्चितच केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर देशभरातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने देशातील महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहेत. दरम्यान यासाठी केंद्र शासनाकडून चाचपणी पण सुरू करण्यात आली आहे. आता लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

यासाठी एका नवीन योजनेची घोषणा होणार असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये सांगितले गेले आहे. यामुळे आता केंद्रातील मोदी सरकार खरच हा निर्णय घेते का याकडे संपूर्ण देशभरातील महिलांचे मोठे बारीक लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment