Monsoon 2024 : मे महिन्याचा पहिला पंधरवडा जवळपास संपत आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य जनतेला देखील मान्सूनची आतुरता लागली आहे. मान्सून 2024 कसा राहणार ? याबाबत जाणून घेण्याची शेतकऱ्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. भारतीय हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज दिला आहे.
स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने देखील असाच अंदाज दिला आहे. काही हवामान तज्ञांनी तर यंदा मान्सूनचे वेळे आधीच आगमन होईल असे म्हटले आहे. अशातच आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी ऑस्ट्रेलियातून एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे.
खरे तर गेल्या वर्षी अर्थातच 2023 च्या मान्सूनवर एलनिनोचे सावट पायाला मिळाले होते. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे.
गेल्या वर्षी कमी पाऊस झाला असल्याने आता अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी देखील सर्वसामान्यांची होरपळ होत असल्याचे चित्र आहे. यामुळे यंदाच्या मान्सून वर देखील एलनिनोचे सावट राहणार का ? यंदाही कमी पाऊस पडणार का ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत.
गेल्यावर्षी कमी पाऊस झाला असल्याने राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळालेले नाहीये. त्यामुळे यंदाच्या मान्सून काळात चांगला पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.
दरम्यान, स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस बरसणार असे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या प्रसन्न वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाने आणि अमेरिकेच्या नोआ या संस्थेने अल निनो हा लवकरच न्यूट्रल स्थितीत जाणार असा अंदाज दिला आहे.
येत्या जून महिन्यात एलनिनो न्यूट्रल स्थितीत येण्याची ८५ टक्के शक्यता असल्याची माहिती या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी एल निनोचा परिणाम मॉन्सून हंगामावर झाला होता. त्यामुळं देशातील बहुतांश भागात पावसानं दडी मारली होती.
त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला होता. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली होती. यंदा मात्र एलनिनो मानसूनवर परिणाम करणार नसल्याचे या संस्थांच्या अंदाजावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यावर्षी मान्सून काळात निश्चितच चांगला पाऊस होणार अशी आशा बळवली आहे.