Monsoon 2024 : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या नजरा आता मान्सूनकडे लागल्या आहेत. मान्सूनचे आगमन कधी होणार हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरे तर सध्या राज्यात वादळी पावसाचे सत्र सुरू आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर मध्ये गारपीटीची शक्यता आहे तर राज्यातील दक्षिण कोकण, खानदेश मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात आणखी काही दिवस वादळी पाऊस सुरूच राहणार असा अंदाज आहे.
अशातच काल अर्थातच बुधवारी भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात एक नवीन अपडेट दिली आहे. मान्सूनचे केरळात नेमके आगमन कधी होणार या संदर्भात हवामान विभागाने मोठी माहिती दिली आहे. खरंतर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी हवामान खात्याच्या माध्यमातून मान्सूनचे यंदा अंदमानात दोन दिवस आधी आगमन होणार असा अंदाज समोर आला होता.
आय एम डी ने यंदा 19 मे ला मान्सूनचे अंदमानात आगमन होणार अशी शक्यता वर्तवली आहे. दरवर्षी अंदमानात मानसून 21 मेच्या सुमारास पोहोचत असतो. पण, गेल्या वर्षी मात्र मान्सूनचे अंदमानात 19 मे लाच आगमन झाले होते.
यंदा सुद्धा मानसून 19 मे 2024 ला अंदमानातं पोहोचणार आहे. दरम्यान काल अर्थातच 15 मे 2024 ला भारतीय हवामान खात्याने मान्सूनच्या केरळ आगमनाची तारीख जाहीर केली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे, मान्सूनचे केरळमध्ये 31 मे च्या सुमारास आगमन होण्याची शक्यता आहे.
मात्र या जाहीर केलेल्या तारखेत तीन-चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता आहे. म्हणजेच केरळमध्ये मान्सूनचे 28 मे 2024 ते 3 जून 2024 या कालावधीत कधीही आगमन होऊ शकते. दरवर्षी केरळमध्ये मान्सून एक जूनच्या सुमारास पोहोचत असतो.
यंदा मात्र हा मान्सून काहीसा लवकर येण्याची शक्यता आहे. तथापि जाहीर केलेला तारखेत तीन-चार दिवस मागेपुढे होणार असा अंदाज असल्याने यावर्षी देखील मान्सून वेळेवरच दस्तक देणार असे भासत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनचे केरळात आगमन कधी होणार? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान आता हवामान खात्याने 28 मे ते तीन जून 2024 या कालावधीत कधीही केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते असे जाहीर केले आहे. म्हणजेच मान्सून लवकरच भारताच्या मुख्य भूमीत अर्थातच केरळमध्ये दाखल होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने आता शेती कामांना वेग येणार आहे.