Monsoon News : मान्सून भारतात दाखल होऊन जवळपास एक पंधरवडा उलटला आहे. केरळमध्ये मान्सून सात जूनला पोहोचला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात मान्सून 11 जूनला दाखल झाला आहे. परंतु राज्यात मान्सूनच आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास अपेक्षित अशा गतीने झाला नाही. अजूनही मान्सून राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातच थबकला आहे. मात्र आता मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. येत्या तीन दिवसात मान्सून पुढे सरकणार आहे.
23 जून पासून मान्सून पुढील प्रवास अधिक गतीने करेल आणि संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू मान्सून पोहोचेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. यंदा मान्सूनची प्रगती मात्र गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमकुवत आहे. यामुळे सध्या सर्वत्र विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. मान्सून कमकुवत राहिला तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होणार आहे. साहजिकच भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित आहे यामुळे अर्थव्यवस्थेवर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनचे असलेले मोलाचे योगदान जाणून घेणार आहोत. खरंतर, मान्सूनमुळे भारत हा शतकानूशतके नंबर एकची अर्थव्यवस्था राहिला आहे. कदाचित तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही मात्र जेव्हा अमेरिका आणि चीन आपल्या अर्थव्यवस्थेची बिल्डिंग करण्यात व्यस्त होते तेव्हा आपला भारत देश हा जगातील सर्वाधिक श्रीमंत देश होता.
भारताची अर्थव्यवस्था ही मान्सूनच्या जोरावर ईसापूर्व तिसऱ्या शतकात जगातील सर्वाधिक श्रीमंत म्हणजेच नंबर एकची अर्थव्यवस्था बनली होती. विशेष बाब म्हणजे 16 व्या शतकापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही नंबर एकच राहिली. यामुळे आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या जडणघडणमध्ये मान्सूनचे योगदान कसे राहिले आहे याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मान्सूनच्या वाऱ्याचा शोध कोणी लावला
असे सांगितले जाते की एक ख्रिस्त पूर्व पहिल्या शतकात मान्सूनच्या वाऱ्याचा शोध लावण्यात आला आहे. या वाऱ्याचा शोध अलेक्झांड्रीयाच्या हिप्पोलिट्स नावाच्या नाविकाने लावला आहे. खऱ्या अर्थाने या शोधा नंतरच भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळाली. मान्सूनच्या वाऱ्याचा शोध लागल्यानंतर सागरी जहाजांनी अरबस्तान आणि युरोपमध्ये भारतापर्यंत व्यापार सुरू करण्यात आला. भारतात मसाले आणि पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस होते. तर विदेशात सोने आणि चांदी मुबलक होते. मान्सूनच्या वाऱ्याचा शोध लागल्यानंतर रोमन साम्राज्य, अरब देशांबरोबर आणि आफ्रिकेसोबत भारताचा व्यापार वाढला.
भारत बनला जगातील नंबर एकची अर्थव्यवस्था
मिळालेल्या माहितीनुसार मोसमी वाऱ्यांचा शोध लागला आणि भारताचा व्यापार झपाट्याने विस्तारू लागला. यानंतर भारतातून मोठ्या प्रमाणात मसाले आणि कापूस विदेशात निर्यात होऊ लागले. यामुळे ईसा पूर्व तिसऱ्या शतकात भारत जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला. विशेष बाब म्हणजे एक, दोन किंवा दहा वर्ष भारताची अर्थव्यवस्था ताकतवर राहिली असे नाही तर 16 व्या शतकापर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक मोठी अर्थव्यवस्था म्हणून कायम राहिली. कौतुकास्पद बाब म्हणजे त्या वेळी जगाच्या एकूण जीडीपीमध्ये भारताचा वाटा 25.1% पर्यंत वाढला होता.
मोसमी वाऱ्यांमुळे भारत बनला गुलाम
भारतीय हवामान मसाले पिकासाठी अनुकूल होते. विशेषता पश्चिम घाट व आजूबाजूचा परिसर या मसाले पिकांच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. म्हणून येथे मोठ्या प्रमाणात काळी मिरी उत्पादित होत असे. ही काळी मिरी अरब मध्ये पोहोचू लागली. अरब मधील काळी मिरी ही रोमच्या माध्यमातून युरोपमध्ये पोहोचली. काळी मिरी आणि भारतीय मसाल्याची मागणी एवढी वाढली की व्यापाऱ्यांना ही मागणी पूर्ण करता येऊ शकली नाही. यादरम्यान पोर्तुगालने नवीन मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
पोर्तुगाल खलाशी वास्को-द-गामा याला या कामात यश मिळाले आणि 1498 मध्ये केरळमध्ये कालिकत येथे वास्को-द-गामा पोहोचला. वास्को द गामा याने भारतातून काळी मिरी पोर्तुगालला नेली आणि तेथे 60 पट अधिक नफ्याने विकली. पोर्तुगाल नंतर डच आणि इंग्रज भारतात आले. 35 व्या शतकात पोर्तुगिजांनी भारताला गुलाम केले आणि नंतर सतराव्या शतकात इंग्रजांनी भारताला गुलाम केले.
भारतीय अर्थव्यवस्थेत मान्सूनचा प्रभाव
खरीप आणि रब्बी पिकांची शेती ही मान्सून वर आधारित आहे. भात, सोयाबीन, कापूस आणि इतर कडधान्य पिकांना अधिक पाणी लागते म्हणून या पिकाची खरिपात लागवड होते. गहू, वाटाणा, बार्ली आणि हरभरा या पिकांना कमी पाणी लागते त्यामुळे याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. रब्बी पिकांची काढणी ही एप्रिल महिन्याच्या सुमारास होते.
त्यावेळी शेतकऱ्यांच्या हातात खरीप आणि रब्बी हंगामातील शेतमाल विकून पैसे येतात. यामुळे देशाचे आर्थिक वर्ष हे एक एप्रिल पासून सुरू होते. अर्थातच मान्सूनच देशाचे आर्थिक वर्ष निश्चित करत आहे. भारतातील जवळपास 70 टक्के जनसंख्या ही प्रत्यक्ष व प्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. यामुळेच भारताच्या एकूण जीडीपी मध्ये वीस टक्के वाटा हा शेतीचा आहे. याचाच अर्थ जर समाधानकारक मान्सून झाला तर शेतीतून चांगले उत्पादन मिळते आणि अर्थव्यवस्थेला बळ मिळते.
परंतु जर मान्सून समाधानकारक राहिला नाही तर यामुळे चांगले उत्पादन मिळत नाही आणि अर्थव्यवस्था निश्चितच कमकुवत बनत असते. यामुळे मान्सून हा भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून याच मान्सूनने भारताला जगातील नंबर एकची अर्थव्यवस्था बनवले आहे आणि याच मान्सूनने भारताला गुलाम देखील बनवले आहे असे बोलले जाते.