राम भक्तांसाठी खुशखबर ! अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, कोणत्या तारखेपासून रामललाच्या दर्शनाला मंदिर खुले होणार? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ayodhya Ram Temple : भारतासहित संपूर्ण जगातील राम भक्तांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. वास्तविक, रामललाच्या जन्मभूमीवरून न्यायालयात अनेक वर्ष खटला सुरू होता. या खटल्याचा मात्र निकाल लागला आणि राम ललाची जन्मस्थळी निश्चित करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने हा ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर प्रभू श्रीरामजीच्या जन्मस्थळीवर भव्य राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.

जेव्हापासून या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू करण्यात आले तेव्हापासूनच मंदिर केव्हा सुरू होणार? असा प्रश्न रामभक्तांकडून विचारला जात होता. आता मात्र राम भक्तांच्या या प्रश्नांचे उत्तर समोर आले आहे. भव्य राम मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे या मंदिरात लवकरच प्रभू श्री रामजी विराजमान होणार आहेत. या मंदिरात रामजींच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित होणार आहे.

प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भव्य प्रभू श्री रामजींचे मंदिर भाविक भक्तांसाठी खुले होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 दरम्यान कोणत्याही एका शुभ मुहूर्तावर अयोध्यातील भव्य राम मंदिरात रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. याबाबत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र शर्मा यांनी एबीपी न्यूजला माहिती दिली आहे.

शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे, राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 15 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 दरम्यान होऊ शकते. विशेष बाब म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असे सांगितले जात आहे. प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर म्हणजेच 24 जानेवारी किंवा 25 जानेवारी 2024 नंतर भव्य राम मंदिर जगभरातील तमाम राम भक्तांसाठी खुले केले जाणार आहे.

यामुळे राम मंदिरात रामालला विराजमान झाल्यानंतर दर्शनाची आस लावून बसलेल्या तमाम राम भक्तांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख जवळपास निश्चित झाली असल्याने आता ‘राम मंदिर वही बनायेंगे, तारीख भी बतायेंगे’ अशा आशयाचे मजकूर सोशल मीडियामध्ये वेगाने व्हायरल होत आहेत.

Leave a Comment