आता रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयात अर्ज करता येणार नाही ! मग कसं मिळणार रेशन कार्ड, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card : जर तुम्हीही नवीन रेशन कार्ड काढू इच्छित असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. वास्तविक आजची ही बातमी तमाम रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, आधी रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसहित अर्ज करावा लागत होता. म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने रेशन कार्ड लाभार्थ्यांना दिले जात होतं.

मात्र या मोबाईल आणि कम्प्युटरच्या युगात सर्वच कामे ऑनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. शासकीय योजना, शासकीय कागदपत्रे आता ऑनलाईन लाभार्थ्यांपर्यंत पोहचवली जात आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड देखील राज्यातील पात्र लाभार्थ्यांना ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एक जून 2023 पासून आता राज्यात ऑनलाईन रेशन कार्ड उपलब्ध होत आहे. यामुळे पूर्वी रेशन कार्ड काढण्यासाठी नागरिकांना जो आटापिटा करावा लागत होता तो बंद होणार असून नागरिकांची मोठी हेळसांड थांबणार आहे. याबाबत खेड तहसील कार्यालयातील तहसीलदार डॉक्टर वैशाली वाघमारे यांनी पुढारी वृत्तसंस्थेला एक मोठी माहिती दिली आहे.

वाघमारे यांनी सांगितल्याप्रमाणे, खेड तहसील कार्यालयात नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी कागदपत्रांसह प्रस्ताव देण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे. म्हणजे आता नवीन रेशन कार्डसाठी पात्र आणि इच्छुक लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

यात ऑनलाइन एप्लीकेशन म्हणजे अर्ज सादर करायचे आहे तसेच कागदपत्रे देखील ऑनलाइनच अपलोड करावी लागणार आहेत. मात्र ऑनलाईन अर्ज करताना नागरिकांनी ऑनलाइन अर्जात विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कशी असणार प्रोसेस 

मिळालेल्या माहितीनुसार, नागरिकांनी रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर हा ऑनलाईन अर्ज तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत पडताळला जाणार आहे. मग पडताळणी केल्यानंतर ऑनलाइनच रेशन कार्डची प्रत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना मिळणार आहे.

एकंदरीत ही प्रत म्हणजेच ई-शिधापत्रिका यापुढे कुठेही वापरता येणार आहे. यामुळे रेशन कार्डसाठी आतापर्यंत नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे. तसेच, 1 जूनपूर्वी ज्या नागरिकांनी नवीन रेशन कार्डसाठी तहसील कार्यालयाकडे म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज म्हणजे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यांचे नवीन रेशन कार्डही तयार करून दिले जाणार आहे.

Leave a Comment