शेतकऱ्यांसाठी गुड न्युज ! 22 ते 24 जून दरम्यान महाराष्ट्रातील ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ही गुड न्यूज आहे पावसा संदर्भात. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात लवकरच पावसाचे आगमन होणार आहे. राज्यातील काही भागात 22 ते 24 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. वास्तविक राज्यात 11 जूनला मान्सूनचे आगमन झाले.

महाराष्ट्राच्या मुख्य भूमीत म्हणजेच तळ कोकणात मान्सून 11 तारखेला पोहोचला. तळकोंकण अर्थातच दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये मान्सूनने इंट्री घेतल्यानंतर लवकरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा आशावाद व्यक्त केला जात होता. परंतु राज्यात मान्सून दाखल झाला आणि तोच हवामानात एक मोठा बदल झाला. अरबी समुद्रात या वर्षातील पहिलं चक्रीवादळ तयार झालं.

चक्रीवादळाने सर्वे समीकरणे मात्र उलटी फिरवली. मान्सून कोकणातच थपकून राहीला. मात्र आता मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाले असून जवळपास नऊ ते दहा दिवसांपासून कोकणात मुक्काम ठोकून असलेला मान्सूनचा पुढील प्रवास लवकरच सुरू होणार आहे. हवामान विभागाने मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक हवामान तयार झाल्याची माहिती दिली आहे.

एवढेच नाही तर हवामान विभागाने 22 ते 24 जून दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, २३, २४ जूनला संपूर्ण कोकणात व्यापक स्वरूपात पाऊस पडणार आहे. तर २२ ते २४ जूनला उत्तर आणि दक्षिण कोकण, विदर्भातील बऱ्यापैकी भागात पावसाची शक्यता आहे.

तर संपूर्ण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहणार आहे. निश्चितच होसाळीकर यांच्या या हवामान अंदाजामुळे विदर्भ, मराठवाडा आणि कोंकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या व्यतिरिक्त हवामान तज्ञ अनुपम कश्यपी यांनी पुढील तीन दिवसात मान्सूनचे राजधानी मुंबईमध्ये आगमन कोणाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबई सोबतच सांस्कृतिक राजधानी पुण्यातही मान्सून पुढील तीन दिवसात दाखल होणार असा अंदाज आहे.

एकंदरीत चक्रीवादळामुळे थांबलेला मान्सूनचा प्रवास आता पुन्हा एकदा सुरू होणार असे चित्र तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निश्चितच ही बातमी दिलासा देणारी राहणार असून खरीप हंगामातील खोळंबलेल्या पेरण्या आता लवकरच सुरू होतील असे चित्र तयार होत असून येत्या काही दिवसात शेतीशिवारात शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे.

Leave a Comment