पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर मार्गांवर ‘या’ ठिकाणी विकसित होणार चार पदरी दुमजली उड्डाणपूल आणि मेट्रो, वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune News : पुणे-अहमदनगर आणि पुणे-सोलापूर या मार्गावर गेल्या काही दशकात वाहतूक कोंडीची समस्या ही सामान्य बाब बनली आहे. शिवाय आगामी काही वर्षात या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अजूनच वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चितच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

अशा परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून या मार्गावरील वाहतूक कोंडी होण्याची भविष्यातील शक्यता लक्षात घेता विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच उपायोजनेचा एक भाग म्हणून या दोन्ही मार्गांवर मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. आता याच मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपूल संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पुणे – सोलापूर या महामार्गावर भविष्यातील वाहतूक कोंडीची समस्या हाताळण्यासाठी हडपसर (रविदर्शन) ते उरुळी कांचन (खेडेकर मळा) यादरम्यान मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपुल विकसित होणार आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकल्पाचा अंतिम आराखडा हा तयार करण्यात आला आहे. तसेच हा प्रकल्प आराखडा आता मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

पुणे – सोलापूर महामार्गाप्रमाणेच पुणे-नगर मार्गावरही चंदननगर ते शिक्रापूर यादरम्यान मेट्रोसह चार पदरी दुमजली उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाला देखील मंजूरी मिळाली आहे. दरम्यान या प्रकल्पाचे काम पुढील काही दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. निश्चितच या दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी या दोन अति महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे कायमची संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी देखील या दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी या दोन प्रकल्पांमुळे कमी होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला आहे. लोणी काळभोर येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान कोल्हे यांनी हा आशावाद व्यक्त केला असून येत्या काही दिवसात या दोन्ही प्रकल्पांचे काम सुरू होईल आणि लवकरात लवकर हे प्रकल्प पूर्ण होतील असे नमूद केले आहे. 

Leave a Comment