Monsoon Tourist Spot : पावसाळा सुरू झालाय, आता उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरंतर, पावसाळ्यातील अल्हाददायक वातावरण पर्यटनासाठी सर्वात अनुकूल. हेच कारण आहे की, पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी जातात. ट्रेकिंग साठी जातात.
निसर्गाचे नेत्र दीपक सौंदर्य आपल्या नजरेत कैद करण्यासाठी पावसाळ्यात फिरण्याची मजाच काही और आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही पावसाळ्यात कुठे फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत निश्चितच वाचायला हवी.
कारण की, आज आपण महाराष्ट्रातील पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्कृष्ट टुरिस्ट स्पॉट संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण अशा टुरिस्ट डेस्टिनेशन संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या डेस्टिनेशनला पावसाळ्यात जाण्याची मजा खूपच अधिक आहे.
लोणावळा :- लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा कुठे कुठे जाऊ मी….; पुढे सांगण्याच काही कामचं नाही. हे गीत आपल्यापैकी अनेकांच्या तोंडपाठ असेल. ते गीतही आहेच तसे भन्नाट. मात्र या गीतात ज्या लोणावळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे ते लोणावळा पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे. यामुळे जर तुम्ही या पावसाळ्यात ट्रिप काढण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लोणावळ्याला अवश्य भेट दिली पाहिजे. खरंतर लोणावळा मुंबई आणि पुण्याच्या लोकांचे वीकेंड डेस्टिनेशन. वीकेंडला या ठिकाणी मुंबई आणि पुण्याहून हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल होतात. पावसाळ्यात ही संख्या वाढते. लोणावळा विशेषतः आपल्या धबधब्यांसाठी पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. यामुळे जर तुम्हालाही पावसाळ्यात धबधबे पाहण्याची आवड असेल तर तुम्ही लोणावळ्याची निवड करू शकता.
माथेरान :- जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि येत्या वीकेंडला फिरण्याचा प्लॅन असेल तर तुमच्यासाठी माथेरान हा एक बेस्ट ऑप्शन राहू शकतो. तसेच तुम्ही राज्यातील इतर भागात राहत असाल तरीही तुमच्यासाठी माथेरान हा पर्याय वाईट ठरणार नाही. कारण की, माथेरान मुंबईपासून अवघ्या 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हिल स्टेशन म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून चीरपरिचित आहे. या हिल स्टेशनवर देखील वीकेंडला मोठी गर्दी राहते. इतरही दिवशी पर्यटक या ठिकाणी तोबा गर्दी करतात. जर आपणांस सुंदर हिरवागार निसर्ग आपल्या डोळ्यानी टिपायचा असेल आणि पावसाळ्यात टेकड्यावर फिरायचे असेल तर आपण माथेरान हिल स्टेशनला अवश्य भेट दिली पाहिजे. असं सांगतात की, पावसाळ्यात इथले वातावरण खूपच सुंदर आणि मनाला शांती देणारे बनते.
महाबळेश्वर :- नावाप्रमाणेच हे ठिकाण लोकांना ताणतणावापासून दूर नेते आणि त्यांना आपल्या आयुष्यात काहीतरी साध्य करण्यासाठी नवीन बळ देते. हो, आपण आपल्या कामाच्या वर्कलोडमधून रिलॅक्स करण्याचा विचार करत असाल तर महाबळेश्वर हे ठिकाण आपल्यासाठी बेस्ट पर्याय राहणार आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यात राहणाऱ्या लोकांसाठी पावसाळ्यातील रोड ट्रिप म्हणून हे डेस्टिनेशन उत्तम राहणार आहे. महाबळेश्वर मॅप्रो गार्डन, स्ट्रॉबेरी आणि आजूबाजूच्या हिरव्या टेकड्यांसाठी ओळखले जाते. यामुळे जर तुम्हाला हिरवागार निसर्ग अनुभवायचा असेल तर महाबळेश्वरला तुम्ही निश्चितच भेट देऊ शकता.
भंडारदरा :- पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचंय. कुठे जावं सुचत नाहीये. मग वाट कसली पाहताय तुम्ही भंडारदराला जावा. भंडारदरा हे ट्रेकिंगसाठी पर्यटकांमध्ये अलीकडे विशेष लोकप्रिय बनले आहे. ज्या लोकांना मुक्कामी ट्रेकिंग साठी जायचे असेल अशा लोकांसाठी भंडारदरा हा एक बेस्ट पर्याय राहणार आहे. कारण की, या ठिकाणी मुक्कामी राहण्यासाठी विशेष सुविधा आहेत. टेकड्या, निसर्गाचे सौंदर्य आणि पावसाळ्यातील प्रसन्न वातावरण या सर्व बाबी ट्रेकिंग साठी भंडारदराला खास बनवतात.
माळशेज घाट :- जर तुम्हाला या वीकेंडला फिरायला जायचे असेल तर तुम्ही माळशेज घाटाकडे आपला मोर्चा वळवू शकता. तुम्हाला धबधबे पाहिजे असतील तसेच महाराष्ट्रातच सिलिकॉन व्हॅली सारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही माळशेज घाटाला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे. कारण की, या घाटातून प्रवास करताना तुम्हाला काही विलक्षण धबधबे आणि सुंदर व्हॅली पाहायला मिळतात. हे दृश्य तुम्हाला इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. हे नेत्र दीपक दृश्य तुम्हाला जर आपल्या डोळ्यांमध्ये कैद करायचे असेल तर तुम्ही एकदा निश्चितच या घाटावरून प्रवास करायलाच हवा. माळशेज घाट हे एक प्रमुख गेले स्टेशन आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके दाटून येतात. यामुळे पावसाळ्यात पर्यटक माळशेज घाटालाही मोठी पसंती दाखवतात.