मुहूर्त मिळाला ! नमो शेतकरी योजनेचा पहिला हफ्ता ‘महाराष्ट्र कृषी दिनी’ वितरित होणार, पीएम किसानचाही त्यांचं दिवशी लाभ मिळणार, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शिंदे-फडणवीस सरकारने केंद्रातील मोदी सरकारच्या पावलांवर पाऊल ठेवत राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. तेव्हापासूनच या योजनेचा पहिला हप्ता केव्हा मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.

मात्र, आता या योजनेच्या पहिल्या हप्ता संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आमच्या हाती आली आहे. वास्तविक पीएम किसान योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक आहे. याच योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून आता राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. दर चार महिन्यांनी दोन हजाराचा एक हप्ता अशा पद्धतीने एका वर्षात तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. एकूणच काय आता राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6000 आणि नमो शेतकरीचे 6000 असे बारा हजार रुपये प्रति वर्ष मिळणार आहेत.

केव्हा मिळणार हफ्ता?

याबाबत कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्र कृषी दिनाचे औचित्य साधून नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्र कृषी दिनी अर्थातच एक जुलैला या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो असे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष बाब अशी की, याच दिवशी पीएम किसान योजनेचे 2000 मिळणार आहेत. म्हणजेच पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता सोबतच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्याच्या नमो शेतकरी योजनेच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रण पाठवले आहे.

अर्थातच राज्यातील या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. याबाबत मात्र शासनाच्या माध्यमातून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. परंतु कृषी विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी शक्यता वर्तवली आहे. 

राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

पीएम किसानसाठी जे निकष आहेत तेच निकष नमो शेतकरी योजनेसाठी आहेत. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा चौदावा हप्ता मिळेल त्याचा शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा पहिला हप्ता मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पीएम किसान योजनेचे राज्यात 73 लाख असे शेतकरी आहेत ज्यांनी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, लाभार्थींच्या नावावरील मालमत्तांची एकत्रित नोंद केली आहे.

यामुळे या 73 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे 2000 असे एकूण चार हजार रुपये एक जुलैला मिळणार आहेत. परंतु या योजनेसाठी राज्यात पात्र ठरविण्यात आलेल्या जवळपास 16 लाख शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी आणि मालमत्तांची एकत्रित नोंदणी केलेली नाही.

यामुळे या 16 लाख शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा पुढील हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी या 16 लाख शेतकऱ्यांना लवकरात लवकर केवायसी, आधार प्रमाणीकरण आणि मालमत्तांची एकत्रित नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.

Leave a Comment