मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! नवीन वेळापत्रक जाहीर, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या अर्थातच मंगळवारी, 27 जून 2023 रोजी मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. यासाठी सर्व आवश्यक पूर्वतयारी रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. खरंतर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोवा येथील मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्च महिन्यात केली.

मार्च महिन्यात दानवे यांनी कोकणातील आमदारांना लवकरच कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असे आश्वासन दिले होते. तेव्हापासूनच या ट्रेनची रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. वास्तविक, ही ट्रेन तीन जूनला सुरू होणार होती. मात्र ही ट्रेन ओडिशा येथील रेल्वे अपघातामुळे तीन जूनला सुरू झाली नाही.

मात्र आता ही ट्रेन 27 जूनला सुरू होणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण आहे. अशातच, मात्र या रेल्वे संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. ती म्हणजे या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून केवळ तीन दिवस धावणार आहे.

पावसाळ्याच्या दिवसात कोकण रेल्वे मार्गावर लादण्यात आलेल्या वेगावरील निर्बंधांमुळे ही एक्सप्रेस आठवड्यातून केवळ तीन दिवस धावणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे आता या ट्रेनचं नवीन वेळापत्रक कस राहणार याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता नागरिकांना लागून आहे. अशा परिस्थितीत आज आपण या ट्रेनचे नवीन वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहुन सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सुटणार आहे. ही गाडी सीएसएमटीहून पहाटे ५.२३ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचणार आहे. म्हणजे ही गाडी पावसाळी काळात जवळपास दहा तास प्रवास केल्यानंतर मुंबईहून गोव्याला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी मडगावहून धावेल. मडगावहून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. मात्र पावसाळी हंगाम संपल्यानंतर जेव्हा ही गाडी नियमित सुरू होईल तेव्हा ही गाडी मात्र सात तासात हा प्रवास करण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

Leave a Comment