Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : भारतात गेल्या एका दशकाच्या काळात विविध रस्ते आणि रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. असाच एक प्रकल्प आहे बुलेट ट्रेनचा. देशातला पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरातला मिळाला आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे.
सध्या या प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून 2026 पर्यंत या प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरु होणार आहे म्हणजेच 2026 मध्ये या मार्गावर बुलेट ट्रेन धावताना दिसणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून या प्रकल्पाचे काम केले जात असून या प्रकल्पाच्या कामासंदर्भात सदर प्राधिकरणाने आता एक मोठी अपडेट दिली आहे.
प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पातील गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील पूल बांधून रेडी झाला आहे. या प्रकल्पातील इतरही कामे जोरात सुरू आहे. ट्रॅकचे काम जपानी तंत्रज्ञानानुसार सुरु आहे. स्थानकाचे कामे देखील जोरात सुरु आहेत.
या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात 21 किलोमीटर लांब भुयारी मार्ग विकसित केला जात आहे, याचा 7 किलोमीटर लांबीचा मार्ग हा समुद्राखालून आहे हे विशेष. मुंबई ते अहमदाबाद हा 508 किलोमीटर लांबीचा मार्ग राहणार आहे. या रेल्वे मार्गावर एकूण बारा स्थानके राहणार आहेत.
बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर ही चार स्थानके महाराष्ट्रातील आहेत. वापी, वलसाड, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद आणि अहमदाबाद ही स्थानके गुजरात राज्यातील आहेत. या मार्गावर 320 ते 350 किलोमीटर प्रति तास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.
या मार्गाची आपल्या महाराष्ट्रात जवळपास 156 किलोमीटर एवढी लांबी आहे. विशेष बाब अशी की या देशातील पहिल्या बुलेट ट्रेन मार्गावर दोन प्रकारच्या बुलेट ट्रेन च्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
एक सेवा एक्सप्रेस राहणार आहे आणि दुसरी सेवा सर्वसाधारण सेवा राहणार आहे. एक्सप्रेस सेवा ही या मार्गावरील काही मोजक्याच स्थानकावर थांबा घेणार आहे.
दुसरीकडे जी सर्वसाधारण सेवा राहील ती या मार्गावरील सर्वच्या सर्व दहा स्थानकावर थांबा घेणार आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणारी एक्सप्रेस बुलेट ट्रेन मुंबई, सुरत, वडोदरा आणि अहमदाबाद याच रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
एक्सप्रेस ट्रेन चा प्रवास हा सर्वसाधारण ट्रेन पेक्षा अधिक जलत राहणार आहे. एक्सप्रेस ट्रेन मुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे.
मात्र, सर्वसाधारण बुलेट ट्रेनने मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन तासाचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रावरून गुजरात आणि गुजरातहुन महाराष्ट्र असा प्रवास सोयीचा होणार आहे.