Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express : महाराष्ट्रातून गुजरातला आणि गुजरातहून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्यांसाठी नुकतीच एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यानच्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला असून या मार्गावर ही गाडी आता सुसाट धावू लागली आहे.
खरेतर भारतात सध्या स्थितीला ५१ महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत सूरु आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. या आठ मार्गांमध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान नव्याने सुरू झालेल्या मार्गाचा देखील समावेश होतो.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला मुंबई सेंट्रल ते गांधीनगर ही देखील गाडी अहमदाबाद मार्गे धावत असून या देखील गाडीमुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास जलद झाला आहे.
मात्र या गाडीला मिळणारा प्रवाशांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहता आणि या गाडीमध्ये होत असलेली प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे. ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक आणि अहमदाबाद रेल्वे स्थानक यादरम्यान धावणार आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास अजून जलद आणि सुरक्षित होणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद ही नव्याने सुरू झालेली वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातील आठवी गाडी आहे. या गाडीला देखील प्रवासी चांगला प्रतिसाद दाखवतील अशी आशा रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. ही गाडी रविवार सोडून इतर सर्व दिवस सुरू राहणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात येथील अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून ही गाडी सकाळी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी रवाना होणार आहे आणि पाच तासांचा प्रवास करून म्हणजेच 11:35 वाजता ही गाडी राजधानी मुंबईमधील मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
दुसरीकडे ही गाडी मुंबई सेंट्रल येथून दुपारी तीन वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे आणि रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी गुजरात येथील अहमदाबादला पोहोचणार आहे. या गाडीमुळे 500 km चा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. यामुळे दैनंदिन कामानिमित्त मुंबईत अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा मिळणार आहे.
स्टॉपेज कुठे राहणार ?
अनेकांच्या माध्यमातून या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही गाडी या मार्गावरील काही मोजक्याच रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार आहे.
ही गाडी महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल या रेल्वेस्थानकाव्यतिरिक्त बोरिवली या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. दुसरीकडे गुजरात मधील वापी, सुरत आणि बडोदा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे.