मुंबईकरांसाठी गुड न्यूज ! मरीन ड्राईव्ह ते वरळी प्रवास फक्त 8 मिनिटात, कोस्टल रोडचे उद्घाटन ‘या’ तारखेला, मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Coastal Road Project : मुंबईकरांसाठी मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार आहे. अशातच मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे मुंबई मधला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील कोस्टल रोड प्रकल्प येत्या आठ दिवसात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.

राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे, या प्रकल्पाचा बिंदुमाधव चौक ते मरीन ड्राइव्ह पर्यंतचा विभाग येत्या आठ दिवसात सुरू होणार आहे.

सामंत यांनी विधान परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. निश्चितच मंत्री महोदय यांनी म्हटल्याप्रमाणे जर या प्रकल्पाचा हा पहिला टप्पा येथे आठ दिवसात सुरू झाला तर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास फक्त आणि फक्त आठ मिनिटात होणार असून यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.

खरे तर वरळी ते मरीन ड्राईव्ह असा नऊ किलोमीटर लांबीचा कोस्टल रोड प्रकल्प बीएमसी तयार करत आहे. मुंबई महानगरपालिकेचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

मात्र या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने या प्रकल्पाचे उद्घाटन नेमके केव्हा होणार असा सवाल मुंबईकरांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.

दरम्यान, याच संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत बोलताना हा प्रकल्प नेमका केव्हा सुरू होणार ? याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

हा राजधानी मुंबई मधील बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित महामार्ग येत्या आठ दिवसात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल असे सामंत यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले आहे.

यामुळे या प्रकल्पाच्या लोकार्पणाची अगदी आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे.

Leave a Comment