Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली. ही गाडी पहिल्यांदा नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्या ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे.

विशेष म्हणजे आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार असून यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर सध्या आपल्या महाराष्ट्रातील आठ महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी धावत आहे.

Advertisement

राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.

यातील सीएसएमटी ते मडगाव अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव, गोवा या दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व असा प्रतिसाद दाखवला जात आहे.

Advertisement

या गाडीमुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईहून कोकणात तथा गोव्यात जाणाऱ्यांचा प्रवास या गाडीने सुपरफास्ट झाला असून गोव्याहून मुंबईला येणाऱ्यांना या गाडीमुळे जलद गतीने पोहोचता येत आहे.

दरम्यान मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलणार आहे.

Advertisement

जसं की आपणास ठाऊकच आहे की मान्सूनमध्ये अर्थातच पावसाळी काळात कोकण रेल्वेचे वेळापत्रक बदलले जाते. यानुसार, मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे वेळापत्रक देखील बदलणार आहे.

10 जून पासून हे नवीन वेळापत्रक लागू होईल. आता आपण मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे पावसाळी वेळापत्रक कसे राहणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कसे राहणार मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचे पावसाळी वेळापत्रक ?

सी एस एम टी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते. मात्र पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस चालवली जाणार आहे. दहा जून ते 31 ऑक्टोबर २०२४ या कालावधीसाठी हे वेळापत्रक लागू राहील.

Advertisement

दुसरीकडे मडगाव-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस नियमितपणे शुक्रवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावते. आता मात्र ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे तीन दिवस धावणार आहे. 10 जून 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 या कालावधीत हे वेळापत्रक लागू राहील.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *