ATM मधून फाटकी नोट निघाल्यास काय करणार ? फाटलेली नोट बदलून मिळणार का ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ATM Cash Withdrawal Rules : एटीएम कार्डधारकांसाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे. खरंतर अलीकडे पैशांचे व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. यूपीआयमुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत खूपच सोपे झाले आहेत. आजच्या घडीला भारतात केवळ एका क्लिकवर पैशांचे व्यवहार पूर्ण होऊ लागले आहेत. फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, भारत पे अशा विविध अँप्लिकेशनचा वापर करून कोणालाही सहजतेने पैसे पाठवता येतात.

यामुळे कॅशलेस इकॉनॉमीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे. यूपीआयच्या वापरामुळे कॅशलेस व्यवहार अधिक वाढले आहेत. कॅशने पैशांचे व्यवहार करण्याऐवजी अनेकजण UPI अँप्लिकेशनने कॅशलेस व्यवहार करण्याला अधिक पसंती दाखवत आहे. मात्र असे असले तरी आजही असे अनेक जण आहेत ज्यांना ऑनलाइन व्यवहार करणे आवडत नाही.

यूपीआय एप्लीकेशनचा अनेक जण उपयोग करत नाही. परिणामी आजही भारतात मोठ्या प्रमाणात कॅशने व्यवहार केले जातात. अशा परिस्थितीत, बँकेतून कॅश काढण्यासाठी ATM चा वापर केला जातो. तुम्हीही कॅश काढण्यासाठी एटीएमचा वापर करता ना? मात्र अनेकदा एटीएम मशीन मधून कॅश काढतांना फाटलेली नोट मिळते.

अशावेळी मात्र आपली मोठी चिडचिड होत असते. एटीएम मधून फाटलेली नोट मिळते, अन ती नोट कोणीच घेत नाही. यामुळे आपले पैसे वाया गेलेत असे वाटते. तुमच्यासोबतही असं कधी घडल आहे का? तुम्हालाही एटीएम मधून फाटलेली नोट मिळाली आहे का? तर मग चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला एटीएम मधून फाटलेली नोट मिळाल्यास काय केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत.

जर समजा तुम्ही एटीएम कार्ड मधून कॅश काढली आणि यात तुम्हाला फाटकी नोट मिळाली तर तुम्ही सर्वप्रथम ती फाटलेली नोट एटीएम मध्ये असलेल्या कॅमेऱ्यात दाखवा. फाटलेली नोट कोणी घेत नाही म्हणून सर्वसामान्य नागरिक अडचणीत येतात. पण, जर एटीएम मधून फाटलेली नोट बाहेर आली असेल तर तुम्ही लागलीच एटीएम मध्ये असलेल्या कॅमेऱ्यात ती नोट दाखवली पाहिजे.

तसेच ज्या बँकेच्या एटीएम मधून तुम्हाला फाटलेली नोट मिळालेली असेल त्या बँकेला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे. सदर बँकेच्या कोणत्याही शाखेत तुम्ही जाऊ शकता. बँकेत गेल्यानंतर तुम्ही तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांना तुम्हाला एटीएम मधून फाटलेली नोट मिळाली असल्याची तक्रार करायची आहे.

यानंतर मग तुम्हाला पैसे काढण्याचा एसएमएस किंवा त्या व्यवहाराची एटीएमची पावती बँक अधिकाऱ्याला दाखवावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला बँक अधिकारी एक अर्ज भरायला सांगतील. तुम्हाला बँक अधिकाऱ्यांकडून दिला जाणारा अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.

अर्जात विचारलेली सर्व माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे आणि सदर अर्ज तुम्हाला बँकेत जमा करावा लागणार आहे. अर्ज जमा केल्यानंतर तुम्हाला एटीएम मशीन मधून मिळालेली फाटकी नोट बदलून दिली जाणार आहे.

Leave a Comment