अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूरसह ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊस बरसणार ! काही भागात उष्णतेची लाट येणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या विषम हवामानाची अनुभूती येत आहे. राज्यातील काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे तर काही ठिकाणी वादळी पाऊस पाहायला मिळतोय. या समिश्र वातावरणामुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना तथा शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात वादळी पाऊस आणि गारपीट झाली असल्याने तेथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामुळे आधीच नैसर्गिक संकटांनी बेजार झालेल्या बळीराजाला मोठा फटका बसला आहे. एक तर बाजारपेठेत शेतमालाला चांगला भाव मिळत नाहीये आणि अशातच वादळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात घट येण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजात आय एम डी ने राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते असे चित्र तयार होत आहे.

तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असेही IMD ने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने म्हटल्याप्रमाणे, आज चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाकिस्तानसह आजूबाजूच्या परिसरावर कायम आहे.

हे वारे मराठवाडा ते तमिळनाडूपर्यंत विस्कळीत स्वरूपात पाहायला मिळतं आहेत. याचा परिणाम म्हणून आज राज्यात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

आज राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मराठवाड्यातील दहा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून या सदर दहा जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे होऊ शकतात असा अंदाज आहे.

विशेष म्हणजे राज्यातील कोकणातील सहा जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे.

आज राज्यातील मराठवाड्यातील धाराशिव, बीड आणि लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या पाच जिल्ह्यांमध्ये तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांमध्ये अशा एकूण दहा जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या दहा जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर या वेगाने वारे वाहू शकतात असे बोलले जात आहे. आय एम डी ने मुंबई, पालघर तथा दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण हवामान राहणार असे म्हटले असून उत्तर कोकणातील ठाणे आणि दक्षिण कोकणातील रायगड या जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार अशी शक्यता व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असा अंदाज आहे. यामुळे या सदर 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना तथा सर्वसामान्य नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

Leave a Comment