सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा किती अधिकार असतो ? कायदा काय सांगतो ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Property Rights : आई-वडिलांच्या संपत्तीवर मुला-मुलींचा अधिकार असतो. कायद्याने मुलांना आणि मुलींना आई-वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार दिला आहे. विशेष बाब अशी की, मुलीचे लग्न झाल्यानंतर हे तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळतो. विवाहित महिलेला आपल्या वडिलांच्या संपत्तीवर तिच्या भावाप्रमाणेच समान अधिकार देण्याची तरतूद कायद्यात आहे.

जर समजा मुलींना लग्न झाल्यानंतर वडीलांच्या संपत्तीत अधिकार मिळाला नाही तर ती न्यायालयात धाव घेऊ शकते. दरम्यान संपत्तीच्या कारणावरून नेहमीच वाद विवाद पाहायला मिळतात. संपत्तीच्या कारणावरून होणारे वादविवाद अनेकदा न्यायालयात जातात.

दरम्यान आज आपण सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा किती अधिकार असतो ? जावयाला देखील आपल्या सासऱ्याच्या संपत्तीत अधिकार मिळतो का ? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खरेतर अनेकांच्या माध्यमातून जावयाचा सासऱ्याच्या संपत्तीवर किती अधिकार असतो हा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, याच संदर्भात केरळ हायकोर्टाने एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. हायकोर्टाने जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार असतो की नाही ? या संदर्भात एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे.

हायकोर्टाने काय म्हटले आहे ?

केरळ हायकोर्टाने एका प्रकरणात असा निकाल दिला आहे की, जावयाला त्याच्या सासऱ्याच्या संपत्तीत, मालमत्तेत कोणताच अधिकार मिळतं नाही. जावाई हा कुटुंबाचा सदस्य नसतो यामुळे त्याला सासऱ्याच्या संपत्तीत कोणताच अधिकार नसतो.

पण, मुलीच्या निधनानंतर जर मुलीला एखादे अपत्य असेल तर ते अपत्य आपल्या आईच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत अधिकार मिळवण्यास पात्र राहू शकते. दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या काही वर्षांपूर्वी एका प्रकरणात असा निकाल दिलेला आहे.

यावरून जर मुलगी हयात नसेल पण तिला मुलबाळ असेल तर ते अपत्य मयत आईच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळवण्यासं पात्र ठरु शकणार आहे. पण, जावयाला त्याच्या सासऱ्याच्या संपत्तीत कोणताच अधिकार नसतो.

Leave a Comment