पोस्टाच्या ‘या’ योजनेत 5 लाखाची गुंतवणूक केल्यास मिळणार 10 लाख 51 हजार रुपये ! पण….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : तुम्ही पोस्ट ऑफिसच्या एखाद्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहात का? अहो मग गुंतवणुकी पूर्वी आजची ही बातमी सविस्तर वाचा. कारण की आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यात गुंतवणूकदारांचे पैसे अवघ्या काही वर्षात दुप्पट होणार आहेत. खरे तर गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांपुढे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.

मात्र सर्वसाधारणपणे बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करण्याला विशेष महत्त्व दाखवले जाते. मुदत ठेवी करणारे लोक बँकेत एफडी करायला प्राधान्य दाखवत असतात, पण, जर एखाद्याला दीर्घ मुदतीची एफडी करायची असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक केली पाहिजे.

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून टाइम डिपॉझिट योजना राबवली जात आहे. या योजनेला पोस्ट ऑफिसची एफडी योजना म्हणून ओळखतात. येथे तुम्हाला 1, 2, 3 आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणुकीचे पर्याय मिळतात.

या भिन्न भिन्न कालावधीच्या गुंतवणुकीवर वेगवेगळे व्याजदर दिले जाते. यातील 5 वर्षांच्या करमुक्त एफडीवर चांगले व्याज मिळतं आहे. जर तुम्ही या योजनेत पैसे गुंतवले तर ते पैसे काही वर्षांत दुप्पट होऊ शकतात.

दरम्यान, आता आपण पोस्टाच्या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर काय आहेत आणि या योजनेत पाच लाख रुपयांची रक्कम गुंतवली तर कशा पद्धतीने 10 लाख 51 हजार रुपये मिळवू शकता याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेचे व्याजदर

यामध्ये एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर 6.9%, दोन वर्षासाठी गुंतवणूक केली तर सात टक्के, तीन वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 7.1% आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 7.5 टक्के एवढे व्याज दिले जात आहे.

पोस्टाच्या या योजनेतुन रक्कम दुप्पट कशी करायची

तुम्हाला या टाईम डिपॉजिट योजनेत सुरुवातीला पाच वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे. यानंतर मग पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी रक्कम गुंतवायची आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेत दोनदा गुंतवणूक करायची आहे.

समजा तुम्ही पोस्टाच्या या पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिट योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला पाच वर्षांनी सात लाख 24 हजार 974 रुपये मिळतील यामध्ये दोन लाख 24 हजार 974 रुपये व्याजाचे राहणार आहेत.

आता पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला की तुम्हाला सात लाख 24 हजार 974 रुपये, म्हणजे पाच लाख रुपये आणि त्यावर मिळालेले व्याजाची रक्कम पुन्हा एकदा पाच वर्षांसाठी गुंतवायचे आहे.

अशा तऱ्हेने मग तुम्हाला दहा वर्षांनी दहा लाख 51 हजार रुपये मिळणार आहेत. अर्थातच पाच लाख रुपयांचे दहा वर्षांनी दहा लाख 51 हजार रुपये होणार आहेत.

Leave a Comment