Mumbai Goa Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची देशातील पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारतातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.
दरम्यान आगामी काळात आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. खरे तर सध्या स्थितीला महाराष्ट्रातून ज्या आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत त्यातील सहा गाड्या एकट्या मुंबईला मिळालेल्या आहेत.
राजधानी मुंबईवरून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या सहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.
यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव अर्थातच मुंबई ते गोवा या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही वंदे भारत ट्रेन कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच फायद्याची ठरली आहे. यामुळे कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास आधीच्या तुलनेत खूपच सुपरफास्ट आणि सुरक्षित झाला आहे.
यामुळे कोकणातील लोकांनी या गाडीवर चांगलेच प्रेम दाखवले आहे. अशातच मात्र पावसाळ्याच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर तेजस एक्सप्रेस आणि मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस रद्द राहणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांच्या माध्यमातून उपस्थित होऊ लागला आहे.
खरे तर कोकण रेल्वे मार्गावर दहा जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी वेळापत्रक लागू केले जाते. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर सर्व गाड्या नियंत्रित वेगाने चालवाव्या लागतात. यामुळे प्रवासासाठी पावसाळ्यात अधिकचा कालावधी लागतो.
यामुळे गाड्यांचे आठवड्यातील दिवस कमी केले जातात. दरवर्षीच्या पावसाळी वेळापत्रकानुसार तेजस एक्सप्रेस आठवड्यातून पाच ऐवजी तीन दिवस तर वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवसांऐवजी तीन दिवस चालवली जाते. खरे तर नियमित गाड्यांचे आरक्षण 120 दिवस आधी सुरू होत असते.
मात्र यावर्षी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस , मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस या एक्सप्रेस गाड्यांचे 10 जून पासूनचे आरक्षण सुरू झालेले नाही. म्हणजेच पावसाळी काळातील या गाड्यांचे आरक्षण अजून सुरू झालेले नाहीये.
यामुळे या गाड्या पावसाळ्यात रद्द होणार का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरे तर, कोकण रेल्वे मार्गावर धावणारे या तीनही गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक अजून IRCTC च्या प्रवासी आरक्षण प्रणालीवर नोंदवले गेलेले नाही.
वेळापत्रकातील हा बदल आरक्षण प्रणालीत अजून नोंदवला गेला नसल्याने या गाड्यांचे 10 जून नंतरचे आरक्षण अजून सुरू झालेले नाहीये. यामुळे जेव्हा रेल्वे कडून या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद आरक्षण प्रणालीत केली जाईल तेव्हापासून या गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे.