मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेस किती डब्यांची असेल ? केव्हा रुळावर धावणार ? रावसाहेब दानवे यांनी दिली मोठी माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai-Jalna Vande Bharat Express : छत्रपती संभाजीनगर, जालना सह संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. मराठवाड्याला लवकरच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.

राजधानी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. राज्याला मिळणारी ही सातवी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राहणार आहे. सध्या महाराष्ट्रातील सहा महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.

राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या सहा मार्गांवर ही गाडी सध्या स्थितीला चालवली जात आहे.

दरम्यान, आता राज्याला या प्रकारातील सातवी गाडी मिळणार आहे. मुंबई ते जालना या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या गाडीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

दानवे यांनी म्हटल्याप्रमाणे ही मराठवाड्याला मिळणारी वंदे भारत ट्रेन 30 डिसेंबर 2023 रोजी सुरू होणार आहे. या गाडीला दस्तुर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

ही गाडी 30 डिसेंबरला म्हणजेच येत्या शनिवारी सकाळी 11 वाजता जालना येथील रेल्वे स्थानकावरून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वेस्थानकाकडे रवाना होणार आहे.

म्हणजेच शनिवारी सकाळी 11 वाजता या गाडीचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार आणि या गाडीला कोणकोणते थांबे मंजूर झाले आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

कस राहणार वेळापत्रक?

ही गाडी जालना रेल्वे स्थानकातून सकाळी ५.०५ मिनिटांनी सुटणार आहे आणि मुंबईला 11 वाजून 55 मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच मुंबई येथून ही गाडी दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे आणि जालन्याला रात्री साडेआठ वाजता पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

ही गाडी या मार्गावरील चार महत्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबवली जाणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. या गाडीला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नासिक आणि ठाणे हे चार महत्त्वाचे थांबे राहणार आहेत. दरम्यान ही गाडी या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर दोन मिनिटांसाठी थांबवली जाणार आहे.

मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस किती डब्यांची राहणार

अनेकांच्या माध्यमातून ही गाडी 16 डब्ब्यांची राहणार की आठ डब्यांची असा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान याबाबत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मुंबई जालना दरम्यान सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन आठ डब्यांची राहणार असे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment