Mumbai Local Railway : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही वर्षात विविध विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील आणि उपनगरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईमधील लोकलसेवेचा देखील विस्तार केला जात आहे. लोकलचा प्रवास जलद व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खरंतर, मुंबई लोकलला मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. मात्र लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गर्दीमुळे वेळेत नागरिकांना प्रवास करता येत नाही. अशातच मात्र पनवेल ते कर्जत दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पनवेल ते कर्जत दरम्यान विकसित होत असलेल्या रेल्वे मार्गातला अडथळा मुंबई उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दूर झाला आहे. यामुळे आता या रेल्वे मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू होणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, या मार्गावर रेल्वेच्या माध्यमातून दोन नवीन रेल्वे रूळ टाकले जात आहेत. मात्र या रुळांमुळे अर्थातच ट्रॅकमुळे खालापूर येथील एका शाळेला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
परिणामी या शाळेच्या माध्यमातून कोर्टात धाव घेण्यात आली. त्यानुसार हायकोर्टात या याचिकेविरोधात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान रेल्वे प्रशासन आणि शाळेच्या माध्यमातून या रेल्वे मार्गाची संयुक्त पाहणी करण्यात आली.
यावेळी रेल्वे प्रशासनाने हा रेल्वे ट्रॅक नेमका कसा तयार होईल याबाबतचा सविस्तर आराखडा सादर केला. रेल्वे ट्रॅक लगत असलेल्या शाळेला त्रास होऊ नये यासाठी दहा फूट उंचीची भिंत बांधली जाणार असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.
यानंतर कोर्टाने ही या ठिकाणी काढली असून हे रेल्वे ट्रॅक बसवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता पनवेल ते कर्जत दरम्यान दुहेरी मार्गीका विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
परिणामी आता पनवेल ते कर्जत दरम्यान लोकलने जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प 2025 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तयारी देखील सुरू करण्यात आली आहे.
यासाठी 2783 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा एकूण 9.6 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग राहणार आहे. या कॉरिडॉरमुळे 25 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे.