सर्वसामान्यांसाठी खुशखबर ! तूर डाळीच्या दरात मोठी कपात, किती रुपयांनी घसरलेत भाव, जाणून घ्या नवीन किमती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Dal Rate : सर्वसामान्यांसाठी नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, गेल्या वर्षभरापासून तेजीत आलेले तुरडाळीचे भाव आता मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

तूर डाळीच्या किरकोळ दरात गेल्या एका वर्षांच्या काळात तब्बल 35 ते 40 टक्क्यांची मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी उत्पादनात झालेली मोठी घट पाहता घाऊक आणि किरकोळ बाजारात तुरडाळ जवळपास दोनशे रुपयांच्या जवळ पोहोचली होती.

किरकोळ बाजारात तुरीचे दर 180 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले होते. यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकातून तूरडाळ गायब झाली होती. विशेष म्हणजे घाऊक बाजारात 160 ते 170 रुपये प्रति किलोचा दर तुरीला मिळू लागला होता.

यामुळे तुरीच्या किमती केव्हा नियंत्रणात येणार हा मोठा सवाल सर्वसामान्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता. दरम्यान सर्वसामान्यांची ही होरपळ पाहता शासनाला स्वस्त दरात तुरडाळ उपलब्ध करून द्यावी लागली.

केंद्र शासनाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी सवलतीच्या दरात तुरडाळ उपलब्ध करून दिली होती. मात्र तरीही अनेकांना याचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे तूर डाळीच्या किमती लवकरात लवकर कमी झाल्या पाहिजे अशी आशा नागरिकांची होती.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जुलै 2023 मध्ये तूर डाळीचा भाव 140 रुपये प्रति किलो एवढा मोठा. त्यानंतर या डाळीच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत गेली.

उत्पादनात झालेली घट आणि सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी यामुळे दिवाळीत तुरडाळ 170 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली. दिवाळीनंतर तरी दर कमी होतील अशी भोळी भाबडी आशा सर्वसामान्यांना होती.

मात्र सर्वसामान्यांची ही आशा पुन्हा फोल ठरली आणि दिवाळीनंतर तूर डाळीच्या दारात आणखी दहा रुपयांची वाढ झाली. नोव्हेंबर मध्ये तुरीचे भाव 180 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचले. मात्र आता बाजारात तुरीचा नवीन माल दाखल झाला आहे.

नवीन शेतमाल बाजारात आल्याबरोबरच बाजारभावात घसरण देखील सुरू झाली आहे.तुरीच्या किरकोळ दरात डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरु झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ ते दहा दिवसांच्या काळात तुरीचे भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत.

किरकोळ बाजारात 180 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले भाव आता 160 रुपये प्रति किलो वर आले आहेत. म्हणजेच किलोमागे वीस रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Comment