Mumbai Metro News : मुंबई शहरात आणि उपनगरात वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरात आणि उपनगरात मेट्रो मार्गांचे जाळे विकसित केले जात आहे. शहरातील विविध मार्गांवर मेट्रो सुरु करण्याचे नियोजन MMRC च्या माध्यमातून आखले जात आहे.
तसेच सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्गांचा विस्तार करण्याचे देखील नियोजन आहे. याशिवाय सध्या ज्या मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्या मेट्रो मार्गांचा देखील विस्तार केला जाणार आहे. यामध्ये कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो मार्गाचा देखील समावेश होतो.
मिळालेल्या माहितीनुसार, या मेट्रो मार्ग 3 चा आता लवकरच विस्तार होणार आहे. खरंतर या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा येत्या काही दिवसांमध्ये मुंबईकरांसाठी सुरू केला जाणार आहे. यासाठी नऊ मेट्रो गाड्या आवश्यक आहेत.
विशेष म्हणजे या सर्व गाड्या आरे येथील कार शेडमध्ये दाखल झाल्या आहेत. अशातच आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थातच एम एम आर सी कडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गिकेचा कफ परेड ते नेव्ही नगर असा विस्तार केला जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
खरंतर मेट्रो मार्ग तीनच्या कामाला 2016 मध्ये सुरुवात करण्यात आली होती. या अंतर्गत 33 किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित केला जात आहे. या 33 किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गावर 27 स्टेशन तयार केली जाणार आहेत.
दरम्यान हा 33 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आणखी अडीच किलोमीटर लांबवला जाणार आहे. म्हणजेच अडीच किलोमीटर पर्यंत या मार्गाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. कफ परेडपासून नेव्हीनगर असा २.५ किमीचा विस्तार केला जाणार आहे.
या विस्तारित मार्गावर एकमेव नेव्ही नगर हे मेट्रो स्थानक विकसित केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या विस्तारित मेट्रो मार्गाचा आराखडा लवकरच मंजूर केला जाणार आहे.
आराखड्याला मंजुरी मिळाली की या विस्तारित मेट्रो मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम 2025 मध्ये सुरू होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.
तसेच मेट्रो मार्ग तीनचा पहिला टप्पा अर्थातच आरे ते बीकेसी हा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे भुयारीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून स्थानकांचे काम 98 टक्के एवढे पूर्ण झाले आहे.
उर्वरित काम देखील जलद गतीने सुरू आहे. यामुळे हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्यांसाठी सुरू होऊ शकतो असे चित्र तयार होत आहे. अशातच आता या मेट्रो मार्गाचा विस्तार करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.
या विस्तारित मेट्रोमार्गासाठी जवळपास 2500 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे विस्तारित मेट्रोमार्गाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर पाच वर्षांच्या काळात हा विस्तारित मेट्रो मार्ग पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
म्हणजेच विस्तारित मेट्रो मार्गाचे काम जर 2025 मध्ये सुरू झाले तर 2030 ते 31 पर्यंत विस्तारित मेट्रो मार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. हा विस्तारित मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर आरे ते नेव्ही नगर असा थेट मेट्रो प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
यामुळे शहरातील नागरिकांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि सुरक्षित होईल असे सांगितले जात आहे. या विस्तारित मार्गामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी सक्षम होणार आहे.