महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार ‘नमो शेततळे अभियान’ राबवणार, राज्यात ‘इतके’ शेततळे तयार होणार, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून कायमच वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात. खरंतर गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. यावर्षी देखील पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे. यंदा महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात सरासरी एवढाही पाऊस झालेला नाही.

यामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित कमाई होणार नाहीये. सोबतच पावसाळी काळात कमी पाऊस बरसला असल्याने रब्बी हंगामातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार नाहीये. दरम्यान शेतकरी बांधवांना या दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याची शाश्वत उपलब्धता व्हावी यासाठी शेततळे उभारण्याचा सल्ला दिला जात आहे.

विशेष बाब म्हणजे राज्य शासनाकडून शेततळे बनवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो शेततळे अभियान राबवले जात आहे.

या अभियाना अंतर्गत राज्यात शेतकऱ्यांना शेततळे बनवण्यासाठी अनुदान पुरवले जात आहे. राज्यात या अभियानांतर्गत 7300 शेततळे बनवले जाणार असून या अभियाना अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत हे अभियान राबवले जाणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना शेततळे विकसित करून दिले जाणार आहे. यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य पुरवले जाणार असून यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीवर मात करता येणार आहे.

शेततळ्यामुळे शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता होणार आहे परिणामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातूनही शेतकऱ्यांना चांगले उत्पादन या ठिकाणी मिळवता येणे शक्य होणार आहे. राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेअंतर्गत येणाऱ्या मागेल त्याला शेततळे या घटकाअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेततळ्यांचा या अभियानात समावेश केला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजनेसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीतून नमो शेततळे अभियान राबवले जाणार आहे.

नमो शेततळे अभियानाच्या अटी आणि शर्ती 

नमो शेततळे अभियानाअंतर्गत शेततळे बांधण्याचे आदेश प्राप्त झाल्यापासून 3 महिन्यांत काम पूर्ण करणे आवश्यक असेल. या अभियानअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळेच्या कामासाठी कोणतेही आगाऊ पैसे दिले जाणार नाहीत.

म्हणजेच सुरुवातीला लाभार्थी शेतकऱ्याला शेततळे बनवण्यासाठी स्वतः खर्च या ठिकाणी करावा लागणार आहे. तसेच शेततळे तयार झाल्यानंतर त्याची देखभाल, दुरुस्ती देखील लाभार्थी शेतकऱ्यालाच करावी लागणार आहे.

शेततळे पूर्ण तयार झाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर तशी नोंद देखील करावी लागणार आहे. शेततळे पूर्ण झाल्यावर स्वखर्चाने शेततळ योजनेचा बोर्ड लावावा लागेल. बांधावर झाडांची लागवड करणे अनिवार्य असेल.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळेचे नुकसान झाले तर भरपाई मिळणार नाही. गरज पडल्यास प्लॅस्टिकच्या अस्तराचा खर्चही शेतकऱ्यांनी स्वतः करावा लागेल, याची नोंद मात्र शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. 

Leave a Comment