Mumbai Metro News : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुण्यात सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गांचा विस्तार केला जात आहे.
मुंबई शहरात आणि उपनगरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने या वाहतूक कोंडी वर उपाययोजना म्हणून मेट्रोचे जाळे विस्तारण्याचे काम सध्या सुरू आहे. अशातच मुंबई मेट्रो बाबत एक अतिशय महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई शहरातील एका अति महत्त्वाच्या मेट्रो मार्गाला डिसेंबर 2023 मध्ये हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
डिसेंबर महिन्यात सुरू होणार महत्त्वाचा मेट्रो मार्ग
मुंबईमधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित भूमिगत मेट्रो मार्ग तीनचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. हा मेट्रो मार्ग मुंबईमधील पहिलाच भूमिगत मेट्रो मार्ग राहणार आहे. या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या वाटेवर असून आतापर्यंत याच्या पहिल्या टप्प्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी आता लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. या पहिल्या टप्प्याचे 90.3% काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. विशेष बाब म्हणजे हा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग देखील लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचा मानस आहे.
हा संपूर्ण भूमिगत मेट्रो मार्ग जून 2024 पर्यंत प्रवाशांसाठी खुला होणार असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने या भूमिगत मेट्रोमार्गाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. प्राधिकरणाने सांगितल्याप्रमाणे, मेट्रो-3 चा पहिला टप्पा म्हणजे आरे ते बीकेसी या मार्गाचे काम जुलै अखेरपर्यंत 90.3 टक्के पूर्ण झाले आहे.
यातील स्थानक आणि बोगद्याचे ९८.२ टक्के, स्थानकांचे स्थापत्य ९४.५ टक्के आनि उर्वरित कामे ७०.५ टक्के पूर्ण झाले आहेत. तसेच मुख्य मार्गातील ट्रॅक उभारणी ९७.७ टक्के आणि ओसीएस वर्क ६०.२ टक्के पूर्ण झाले आहे. दरम्यान उर्वरित कामे देखील जलद गतीने सुरू असून ही कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून डिसेंबर महिन्यातच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्याचा मानस प्राधिकरणाचा आहे.