केंद्राच्या ‘त्या’ निर्णयानंतरही कांदा बाजारभाव तेजीतच ! कांद्याला मिळाला 3300 चा भाव, कोणत्या बाजारात मिळाला विक्रमीं भाव? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion Rate Maharashtra : केंद्र शासनाने कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर गेल्या दोन महिन्यांपासून टोमॅटोचे बाजार भाव तेजीत आहेत. टोमॅटोचा बाजार तेजीत आला असल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत असून सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून सध्या सर्वत्र या मुद्द्यावरून शासनाला वेठीस धरले जात आहे.

विशेष म्हणजे टोमॅटोचे बाजार भाव तेजीत असतानाच कांद्याच्या बाजारभावात देखील मोठी वाढ होत आहे. गेल्या एका महिन्याभरापासून कांद्याचे बाजार भाव हळूहळू वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे क्रिसिल रिपोर्ट मध्ये नुकताच असा दावा करण्यात आला आहे की, येत्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात कांद्याचे किरकोळ बाजारातील दर 55 ते 60 रुपये प्रति किलो एवढे होणार आहेत.

अशा परिस्थितीत केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि कांद्याच्या वाढलेल्या किमती कमी करण्यासाठी, किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी बफर स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

ग्राहक विभागाचे सचिव रोहितकुमार सिंग यांनी नाफेड आणि NCCF च्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी झालेल्या या निर्णयानुसार आता खुल्या बाजारात शासनाच्या बफर स्टॉक मधील तीन लाख मेट्रिक टन कांदा विक्रीसाठी पाठवला जाणार असून कांदा दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी नाफेडच्या माध्यमातून साठवून ठेवलेला कांदा खुल्या बाजारात पाठविण्यास मंजुरी दिली असल्याने कांद्याचे बाजार भाव आता कमी होतील असा अंदाज आहे. मात्र असे असले तरी आत्तापर्यंत केंद्र शासनाच्या या निर्णयाचा बाजारावर काहीच परिणाम झालेला नाही.

काल जरूर राज्यातील काही बाजारात 100 ते 150 रुपयांची घसरण नमूद करण्यात आली होती. पण काही बाजारात अजूनही कांद्याला चांगला भाव मिळत आहे. आज 13 ऑगस्ट 2023 रोजी राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 3300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे.

या एपीएमसीमध्ये आज बारा हजार अठरा क्विंटल कांद्याची आवक झाली असून कांद्याला किमान 700 रुपये प्रति क्विंटल, कमाल 3300 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.

Leave a Comment