मुंबईत म्हाडाच्या घरासाठी ‘या’ केंद्रीय मंत्र्यांने केलाय अर्ज…! कोणत्या घरासाठी टाकलाय अर्ज, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Mhada News : मुंबईमध्ये घर असावे अशी इच्छा अनेकांची आहे. मात्र मुंबईमधील घरांच्या वाढलेल्या किमती अनेकांचे हे स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीत. अशा परिस्थितीत जर मायानगरी मुंबईमध्ये घर घ्यायचे असेल तर म्हाडा आणि सिडकोच्या घरांकडे नागरिक आपला मोर्चा वळवतात.

अलीकडे तर म्हाडाच्या घरांसाठी आमदार, खासदार, मंत्री, बॉलीवूडमधील कलाकार, मराठी सिनेसृष्टीतील कलाकार देखील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करत आहेत. यावर्षी मुंबई मंडळाने काढलेल्या चार हजार 82 घरांसाठीच्या सोडतीत देखील अनेक लोकप्रतिनिधींनी अर्ज सादर केले आहेत.

विशेष म्हणजे या घरांसाठी चक्क केंद्रीय मंत्र्यांने अर्ज सादर केल्याची माहिती म्हाडा मुंबई मंडळाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम यादीतून समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मुंबई मंडळाच्या चार हजार रुपयांचे घरांसाठीच्या संगणकीय सोडतीसाठी पात्र अर्जदारांची अंतिम यादी म्हाडा मुंबई मंडळाने 28 जुलै 2023 रोजी म्हणजे काल जारी केली आहे.

या यादीत केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांचा देखील समावेश आहे. कराड यांनी या लॉटरी मधील सर्वात महागड्या घरांसाठी अर्ज सादर केला आहे. त्यांनी ताडदेव येथील साडेसात कोटी रुपयांच्या घरांसाठी अर्ज सादर केला आहे. कराड यांनी अर्ज केलेल्या मुंबईच्या ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील 142.30 चौ. मीटर क्षेत्रफळाचे हे घर आहे.

या घराची किंमत तब्बल 7 कोटी 57 लाख 94 हजार 267 रुपये आहे. तर कराड यांनी हे अर्ज लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून केला आहे. भागवत कराड व्यतिरिक्त जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी देखील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर केला आहे. 

लोकप्रतिनिधी म्हाडाच्या घरासाठी अर्ज करू शकतात का?

शासनाने तयार केलेल्या नियमानुसार, म्हाडाच्या लॉटरीतील एकूण घरांपैकी 2 टक्के घरे खासदार आणि आमदारांसाठी राखीव असतात. तसेच म्हाडा लॉटरीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी, म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील घरे राखीव असतात.

या 4,082 सदनिकांच्या लॉटरीतही 80 घर खासदार/आमदार/एमएलसी यांच्यासाठी राखीव आहेत. कराड हे राज्यसभेचे खासदार आणि केंद्र सरकारचे अर्थ राज्यमंत्री आहेत. कुचे हे बदनापूर मतदारसंघातील भाजपचे आमदार आहेत.

कराड आणि कुचे हे दोघेही महाराष्ट्रातील आहेत यामुळे त्यांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला आहे. दरम्यान 4 हजार 82 घरांसाठीची संगणकीय सोडत पावसाळी अधिवेशनानंतर काढली जाणार असं सांगितलं जात आहे. याची अद्याप तारीख आणि वेळ मात्र निश्चित झालेली नाही.

Leave a Comment